शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीकडे असं काही प्रेम व्यक्त केलं; ३ वर्ष तुरुंगात जाणं नशिबी आलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 21:02 IST

I love you सह हिंदी शायरी लिहिलेली चिठ्ठी ठरली महत्वाचा पुरावा...

पुणे : अश्लिल हावभाव करुन शायरी लिहिलेली व प्रेम व्यक्त करणारा संदेश असलेली चिठ्ठी अल्पवयीन मुलीच्या दिशेने फेकणार्‍या तरुणाला विशेष जिल्हा न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

अरुणकुमार भगत (वय २२, रा. तळेगाव दाभाडे) असे शिक्षा झालेल्यांचे नाव आहे. ही घटना मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे २५ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली होती. ही अल्पवयीन मुलगी घराकडे जात होती. त्यावेळी आरोपीने तिच्याकडे बघून अश्लिल वक्तव्य केले. त्यानंतर त्याने तिच्या दिशेने आय लव यु तसेच हिंदी शायरी व त्याखाली मोबाईल नंबर असलेली चिठ्ठी फेकली.तळेगाव पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी ५ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पिडीत मुलीची साक्ष व त्याला पृष्टी देणारी आरोपीने फेकलेली चिठ्ठी हा पुरावा महत्वाचा ठरला. न्यायालयाने पुरावा ग्राह्य धरुन आरोपीला ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार नितीन पवार यांनी सहाय्य केले.

टॅग्स :PuneपुणेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjailतुरुंगCourtन्यायालय