शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत पोलिसांच्या सतर्कतेमुळे बनावट रेमडेसिविर विक्री रॅकेटचा पर्दाफाश; ४ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 15:23 IST

राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रूग्णांसह नातलगांचा देखील जीव टांगणीला लागला आहे.

बारामती : रेमडेसिविरच्या तुटवड्याचा फायदा उचलत बारामतीमध्ये मोकळ्या झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड पॅरासिटीमॉल भरून ३५ हजार रूपयांना एक इंजेक्शन विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. सापळारचून बारामती येथील पेन्सिल चौकात शुक्रवारी (दि. १६) मध्यरात्री बारामती ग्रामीण पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बनावट रेमडेसिविर विक्रीमध्ये बारामतीतील एका कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा यामध्ये सहभाग आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेला देखील मोठा धक्का बसला आहे.

या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनचे निरीक्षक विजय नगरे यांनी फिर्याद दिली आहे.  या प्रकरणी मुख्य सुत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (वय ३५, रा. काटेवाडी, ता. बारामती) याच्यासह प्रशांत सिध्देश्वर घरत (वय २३, रा. भवानीनगर, ता. इंदापूर),संदिप संजय गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती), शंकर दादा भिसे (वय २२, रा. काटेवाडी, ता. बारामती) यांना बारामती ग्रामीण पोलिसांनीअटक केली आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये वेगाने संक्रमण होत आहे. अशा परिस्थितीत राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रूग्णांसह नातलगांचा देखील जीव टांगणीला लागला आहे. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा उचलत रेमडेसिव्हीरच्या काळ्याबाजाराला देखील प्रचंड जोर आला आहे. 

उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरासह तालुक्यात देखील रेमडेसिविरचा काळा बाजार होत असल्याची खबर बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याचा मिळाली होती. त्यासाठी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचत काळाबाजर करणाऱ्या आरोपींशी संपर्क साधण्यात आला. यावेळी आरोपीने ३५ हजार रूपयांना एक इंजेक्शन मिळेल. तुम्ही पेन्सिल  चौकामध्ये या, असे सांगितले. यावेळी बारामती ग्रामीण पोलिसांनी पेन्सिल चौकात सापळा रचला ठरल्या वेळेप्रमाणे रात्री साडेबाराच्या दरम्यान आरोपी प्रशांत घरत व  शंकर भिसे पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्यूनर कार (एमएच ४३, एमव्ही, ९६९६) मधून आलेल्या आरोपींची व खबऱ्याची भेट झाली. प्रसंगावधान दाखवत पोलिसांनी तातडीने चार आरोपींना ताब्यात घेतले.

दरम्यान, कोविड सेंटरमध्ये सफाई कार्मचारी म्हणून काम करीत असलेल्या अवघ्य २२ वर्षाचा संंदिप गायकवाड हा मोकळ््या झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमॉल भरून मुख्य सुत्रधार दिलीप गायकवाड याच्याकडे देत होता. या बदल्यात संदिपला १० ते १२ हजार रूपये दिले जात होते. सिरिंजच्या सहाय्याने या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमॉल भरून अवघ्या दहा ते पंधरा रूपयात ही बनावट रेमडेसिव्हीर तयार करून ३५ हजार रूपयांना एक या प्रमाणे काळया बाजाराने विकले जात होते.  तसेच रेमडीसीव्हीरच्या मागणीसाठी कोणी संपर्क साधला तर इंजेक्शन पोहचवण्याची जबाबदारी प्रशांत घरत व शंकर भिसे यांच्यावर होती. आतापर्यंत या रॅकेटमध्ये चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी यामध्ये कोण सहभागी आहे का याबाबत चौकशी सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या रॅकेटच्या माध्यमातून नविन माहिती समोर येणार आहे. आरोपींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमन कायदा, औषधे व सौदर्यप्रसाधने कायदा, औषध किंमत नियंत्रण कायद्यन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या कारवाईबद्दल ग्रामीण पोलिस अधिक्षकांच्या वतीने बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याला २५ हजाराचे बक्षिस जाहिर करण्यात आले आहे.  या कारवाईमध्ये पोलिस निरिक्षक महेश ढवाण, हवालदार आर. जे. जाधव, आर. एस. भोसले, डी. एन. दराडे, निखिल जाधव आदींनी सहभाग घेतला.

बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शनमुळे कोणत्या रूग्णाला अपाय झाला आहे का किंवा कोणता रूग्ण दगावला गेला आहे का याबाबत अजून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी नविन माहिती समोर येईल तशी आरोपींंवर कलमे वाढत जाणार आहेत. नागरिकांनी देखील काळ््याबाजार मिळणारी कोणतिही औषधे खरेदी करू नयेत. त्यामुळ तुम्हाला आर्थिक झळ तर बसणारच आहे. त्याचप्रमाणे तुमच्या रूग्णाचा जीव देखील धोक्यात येणार आहे. मान्यताप्राप्त औषधालय, अथवा शासकीय रूग्णालयामधूनच औषधे घ्यावीत.- नारायण शिरगावकर, उपविभागिय पोलिस अधिकारी, बारामती.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंfraudधोकेबाजीArrestअटकPoliceपोलिस