शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन पुलांची ‘एक्स्पायरी डेट’ संपली; बारामती, इंदापूर, पुरंदरमधील स्थिती, नव्या पुलांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:59 IST

बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस व पुरंदरच्या काही भागास वरदान ठरलेल्या नीरा डावा आणि नीरा उजवा कालव्यांसह नीरा नदीवरील सर्वच पुलांची  ‘एक्स्पायरी डेट’ संपली असून, या पुलांना १३५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

ठळक मुद्देब्रिटिशकालीन यंत्रणा अजून बदललेली नसून, कालव्याला झाडाझुडपांचा विळखापुलांकडे व कालव्यावरील विविध बांधकामांकडे पाटबंधारे खात्याने लक्ष देण्याची गरज

सोमेश्वरनगर : बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस व पुरंदरच्या काही भागास वरदान ठरलेल्या नीरा डावा आणि नीरा उजवा कालव्यांसह नीरा नदीवरील सर्वच पुलांची  ‘एक्स्पायरी डेट’ संपली असून, या पुलांना १३५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हे पूल पाडून पुन्हा नव्याने बांधण्याची गरज आहे. भोर (जि. पुणे) या ठिकाणी नीरा नदीवर इंग्रज सरकारने सन १८८१ मध्ये भाटघर धरणाचे काम पूर्ण केले. तर नीरा नदीच्या दोन्ही बाजूने बारामती व इंदापूर तालुक्यासाठी नीरा डावा कालवा व फलटण व माळशिरस तालुक्यांसाठी नीरा उजवा कालवा, या कालव्याची कामेही त्याच वेळी पूर्ण केली. तसेच दोन गावांतील संपर्क वाढण्यासाठी व दळणवळणासाठी भाटघर धरणांबरोबरच कालाव्यांवरील व नीरा नदीवरील पूल तसेच पालथ्या मोऱ्या व भुयारी मोऱ्यांची निर्मिती केली. कालव्यावरील काही पुलांच्या बांधकामावेळी बांधकाम करणाऱ्या कारागिरांनी दगडावर कोरीव १८८१ हे वर्ष टाकले आहे. यावरून कालव्यावरील पूल १८८१ साली बांधल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, आज या पुलांना १३५ वर्षे पूर्ण झाली असून ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. अनेक पुलांची दगडे निखळून पडली आहेत. पुलांना मध्यभागी बोगदे पडले आहेत. तर भुयारी मोऱ्यांना पाण्याच्या धारा लागल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात पाटबंधारे खात्याने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.  १८८१मध्ये बांधलेले छोटेखानी भाटघर धरणाचे इंग्रज सरकारने १९१२ साली काम हातात घेतले. ते सलग १५ वर्षे चालले. सन  १९२७ साली नवीन भाटघर धरणाचे काम पूर्ण झाले. त्याआधी ५.३३ टीएमसी असणाऱ्या भाटघर या छोट्या धरणाचे विस्तारीकरण करून ते २३.७२ टीएमसी करण्यात आले. भारत देश स्वतंत्र झाल्यावर सन १९६४ साली पुरंदर तालुक्यातील वीर येथे नीरा नदीवर ९.०४ टीएमसी वीर धरणाचे काम पूर्ण करण्यात आले.  मात्र आता ‘आयत्या बिळावर नागोबा’ अशी अवस्था भाटघर व वीर पाटबंधारे खात्याची झाली आहे. ब्रिटिशकालीन यंत्रणा अजून बदललेली नसून, कालव्याला झाडाझुडपांनी विळखा दिला आहे तर गावोगावचे पाणवठे व घाटही उध्व्स्त झाले आहेत. गेल्या १३५ वर्षांपासून कालव्याच्या वितरिकेचे विमोचक बदलले नाहीत. ते जीर्ण झाले असून, पाणी सोडण्याची प्रकिया अवघड बनली आहे.  पंधरा ते वीस वर्षांपासून या कालव्याकडे दुर्लक्ष झाले आहे. नीरा डाव्या कालव्याची लांबी १५२ किलोमीटर आहे. या अंतरात जवळपास ६२ वितरिका (फाटे) येतात. यापैकी ८० टक्के वितरिका नादुरुस्त आहेत. त्यामुळे पाण्याची गळती सुरू आहे. या पुलांकडे व कालव्यावरील विविध बांधकामांकडे पाटबंधारे खात्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरPurandarपुरंदर