बालेवाडीत अनुभवा शुभा मुद्गल यांचे गायन अन् नीलाद्री कुमार यांचे झिटार वादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 13:17 IST2025-10-16T13:13:55+5:302025-10-16T13:17:36+5:30
पुणे आणि पिंपरी चिंचवड रसिक प्रेक्षकासाठी अविस्मरणीय सांगितिक पर्वणी

बालेवाडीत अनुभवा शुभा मुद्गल यांचे गायन अन् नीलाद्री कुमार यांचे झिटार वादन
पुणे: दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि सौंदर्याचा सण आणि या सणाच्या पहाटेला सूर, लय आणि भावना यांचा संगम झाला, तर ती सकाळ खऱ्या अर्थाने मंगलमय ठरते. अशीच एक स्वरमय पहाट पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवता येणार आहे. डॉ. सागर गणपतराव बालवडकर प्रस्तुत लोकमत ‘स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ सोमवार (दि.२०) ऑक्टोबर रोजी पहाटे ५:३० वाजता, बालेवाडी येथील सी. एम. इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर रंगणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या मंचावर संगीत विश्वातील दिग्गज एकत्र येत आहेत ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेतलेल्या शुभा मुद्गल या अभिजात संगीतात रममाण होत असतानाच पॉप आणि फ्यूजनसारख्या नव्या संगीत प्रकारांमध्येही वेगळेपणाने झळकल्या आहेत. तसेच, नीलाद्री कुमार यांच्या सितारच्या सुरांमधून निर्माण होणारी जादू बालेवाडीच्या प्रेक्षकांना ‘स्वरस्नान’ घडवणार आहे. हा कार्यक्रम एएनपी कॉर्प यांच्या सहयोगाने होणार असून, सहयोगी प्रायोजक न्याती ग्रुप, सुहाना मसाले, परांजपे स्कीम स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड, साहील बिल्डर, लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप सोसायटी, काका हलवाई स्वीट सेंटर आणि पीएनजी एक्सक्लुझिव्ह आहेत. तर सह प्रायोजक मनोहर सुगंधी, शुभम ग्रुप ऑफ कंपनीज आऊटडोर पार्टनर डीओओएच ॲडोंमो, घे भरारी आणि लोकमत सखी आहेत.
दिवाळी पहाट ही केवळ संगीताची नव्हे, तर आत्मिक आनंदाची अनुभूती देणारी सकाळ आहे. शुभा मुद्गल आणि नीलाद्री कुमार यांच्या सादरीकरणामुळे या वर्षीची पहाट रसिकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. - डॉ. सागर गणपतराव बालवडकर, संस्थापक अध्यक्ष, श्री खंडेराय प्रतिष्ठान
लोकमतच्या या उपक्रमाला साथ देणे म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेला बळ देणे. आम्हाला आनंद आहे की या कार्यक्रमातून शास्त्रीय आणि आधुनिक संगीताची सुंदर सांगड रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. - सौरभ अडवाणी, संचालक, एएनपी कॉर्प
‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ हे केवळ सांस्कृतिक पर्व नाही, तर पुण्याच्या ओळखीचा एक भाग बनले आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवडकरांना या मैफलीद्वारे साक्षात सप्तसुरांचा कलाविष्कार अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे रसिकांनी या स्वरमैफलीचा नक्की अनुभव घ्यावा. - सचिन गर्ग, साहिल बिल्डर
प्रत्येक वर्षी ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ या कार्यक्रमातून संगीताचा आणि संस्कृतीचा दिवा अधिक तेजाने प्रज्वलित होतो. या वर्षी शुभा मुदगल आणि नीलाद्री कुमार यांच्या सादरीकरणाने तो प्रकाश अधिक उजळणार आहे. - अमित परांजपे, संचालक, परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड
विनामूल्य प्रवेशिका पुढील केंद्रांवर उपलब्ध
एस. के. पी. कॅम्पस : सी. एम. इंटरनॅशनल स्कूल मैदान, बालेवाडी • काका हलवाई स्वीट सेंटर : सुखवानी प्रेस्टीज, मेरिडियन आइस्क्रीमशेजारी, सागर को - ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, बावधन • जयराज हाईट्स, न्यू दत्तनगर, शंकर कळत नगर, वाकड, • अब्जा पॅव्हेलियन, रागदारी सोसायटी, औंध. • जांभुळनगर कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, मारुंजी आरडी, हिंजवडी • लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड : विधाते टॉवर, औंध • माय वर्ल्ड सोसायटी, बालेवाडी हाय स्ट्रीट, बाणेर. • पीएनजी एक्सक्लुजिव्ह : गार्डियन स्क्वेअर, शोरूम नं. १, निसर्ग हॉटेलजवळ, एरंडवणे, पुणे • रानडे कॅपिटल, बाणेर-म्हाळुंगे रॉड, पंजाब नॅशनल बॅंकेजवळ, बाणेर • लोकमत कार्यालय: सिंहगड रोड आणि लॉ कॉलेज रस्ता.
कधी कुठे केव्हा ?
सोमवार, २० ऑक्टोबर २०२५, पहाटे ५:३० वा
स्थळ : सी. एम. इंटरनॅशनल स्कूल मैदान, एस. के. पी. कॅम्पस, बालेवाडी