शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

बारामतीची सिध्दी घेणार इस्रोत चांद्रयान मोहिमेच्या ‘लँडिंग’ चा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 21:09 IST

विद्यार्थीनीला 'इस्रो'च्या बंगळूर येथील नियंत्रण कक्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बसून चांद्रयान मोहिमेच्या लँडिंग क्षण अनुभवण्याचा सन्मान मिळाला आहे.

पुणे (बारामती) : येत्या ७ सप्टेंबर रोजी  तिला चांद्रयान मोहिमेच्या लँडिंग क्षणाचा अनुभव घेता येणार आहे.  सिध्दी विश्वंभर पवार असे या विद्यार्थीनीचे नाव आहे.ती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विनोद कुमार गुजर बालविकास मंदिर शाळेत नववीमध्ये शिक्षण घेत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून लाँच करण्यात आलेलं चंद्रयान २ लँड होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.संपुर्ण देशासाठी हा अभिमानाचा  क्षण आहे. चंद्रयान २ चं लँडिंग स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही पाहणार आहेत. यावेळी पंतप्रधानांसमवेत  बसून या ऐतिहासिक क्षणाची ती साक्षीदार होणार आहे.

 सिद्धी  हिने इस्रोने आयोजित केलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमात पाच मिनिटात अवघड प्रश्नांची उत्तरं दिली. तिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवलाय. तिच्या यशामुळे तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चंद्रयान २ मोहिमेच्या लँडिंगचा अनुभव घेता येणार आहे.इस्रोने अवकाश कार्यक्रमासंदर्भात देशातील विद्यार्थ्यांची जागृती वाढवण्याच्या टाकलेले हे पाऊल आहे. 'इस्रो'ने कार्यक्रमासंदर्भात देशातील विद्यार्थ्यांची जाणीवजागृती वाढविण्याच्या दृष्टीने ऑनलाइन प्रश्नमंजूषा आयोजित केली होती.शाळेमार्फत देण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे तिला या प्रश्नमंजूषेची माहिती देण्यात आली. यामध्ये पाच मिनिटांत २० प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन सिद्धी  हिने दिली.या परीक्षेद्वारे तिने  १०० पैकी १०० गुण मिळवले.तसेच पैकीच्या पैकी गुण मिळवत महाराष्ट्रातून जिंकण्याचा मान मिळवला. हे  यश मिळविणारी ती  राज्यातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. 

टॅग्स :Baramatiबारामतीisroइस्रोStudentविद्यार्थी