कर्वेनगरमध्ये अनुभवा अनोखी जुगलबंदी ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:20 IST2025-10-17T15:19:35+5:302025-10-17T15:20:30+5:30
पद्मभूषण पं. विश्व मोहन भट्ट, पद्मश्री विजय घाटे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांचा कलाविष्कार २२ ऑक्टोबरला

कर्वेनगरमध्ये अनुभवा अनोखी जुगलबंदी ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ मध्ये
पुणे : भारतीय शास्त्रीय संगीत विश्वात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे पद्मभूषण पं. विश्व मोहन भट्ट हे ‘मोहन वीणा’चे जनक म्हणून जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत. ‘स्पॅनिश गिटार’ला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची जोड देऊन त्यांनी या वाद्याला नवा आयाम दिला. त्यांच्या सर्जनशीलतेने जगभरातील संगीतप्रेमींना भुरळ घातली. अशा या दिग्गज कलाकाराचा कलाविष्कार पुणेकरांना ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’मध्ये अनुभवता येणार आहे.
पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत या कार्यक्रमात पं. भट्ट यांच्यासोबत तबलावादक पद्मश्री विजय घाटे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांची जुगलबंदी अनुभवता येणार आहे. ही दिवाळी पहाट येत्या बुधवारी (दि.२२) रोजी पहाटे ५:३० वाजता कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे रंगणार आहे. हा कार्यक्रम न्याती ग्रुप आणि सुहाना मसाले यांच्या सहयोगाने, तर पीएनजी ज्वेलर्स, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, काका हलवाई स्वीट सेंटर, गिरीश खत्री ग्रुप. तर सह-प्रायोजक म्हणून मनोहर सुगंधी, शुभम ग्रुप ऑफ कंपनीज, डीओओएच ॲडोंमो, घे भरारी आणि सखी आहेत. दिवाळीच्या मंगल प्रसंगी शास्त्रीय संगीताच्या माधुर्याने पहाट उजळवणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन ओंकार दीक्षित करणार आहेत.
विनामूल्य प्रवेशिका पुढील केंद्रावर उपलब्ध : (प्रवेश विनामूल्य प्रवेशिका आवश्यक)
* पीएनजी ज्वेलर्स : पीएनजी हाऊस, लक्ष्मी रस्ता, कुंटे चौक • कॉमर्स अव्हेन्यू, पौड रोड, पुण्याई सभागृहासमोर, कोथरूड, पुणे • वेंकटेश स्कायडेल, राजाराम ब्रिज, सिंहगड रोड • काका हलवाई स्वीट सेंटर : चित्रलेखा अपार्टमेंट, आयडियल कॉलनी, कोथरूड • प्रेस्टीज कॉर्नर, गणेशनगर रोड, अलंकार पोलिस स्टेशन शेजारी. • आयुर्वेद रसशाळेसमोर, कर्वे रोड • यशस्वी स्क्वेअर इमारत, कर्वे पुतळ्याजवळ • टिळक रोड, अभिनव कॉलेजजवळ, स्वारगेट • वारजे महामार्ग, ए विंग, हायवे हाइट्स, शॉप नं, १, मुंबई बंगलोर हायवे, आरएमडी कॉलेज जवळ • शॉप नं २९/ ३०, काकडे प्लाझा, वारजे जकात नाका, कर्वेनगर, काकडे शहर • खत्री बंधू पॉट आइस्क्रीम आणि मस्तानी: न्यू फ्रेंड्स कंपनी, पौड रोड, लोकमान्य कॉलनी, कोथरूड • विठ्ठल मंदिरासमोर, मधुसंचय सोसायटी, कर्वेनगर. • गोयल गंगा हाऊसिंग सोसायटी, खाऊगल्ली, माणिकबाग. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड: • श्रेयस अपार्टमेंट, नवीन डीपी रोड, कोथरूड • सेनापती बापट रोड, रत्ना हॉस्पिटलशेजारी, मॉडेल कॉलनी • बांदल कॅपिटल, पौड रोड • केसरीवाडा, नारायण पेठ • एस. एम. जोशी फाउंडेशन, पत्रकार भवन शेजारी, गांजवे चौक • मीना सोसायटी, डहाणूकर कॉलनी,कोथरूड • रसिक साहित्य: आप्पा बळवंत चौक • मनोहर सुगंधी: हरिवंश बिल्डिंग, अकरा मारुती कोपरा, शुक्रवार पेठ • मारणे हाईट्स, महात्मा फुले मंडईजवळ, पुणे • महालक्ष्मी लॉन्स: राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर. • लोकमत कार्यालय: सिंहगड रोड आणि लॉ कॉलेज रस्ता.
दिनांक : बुधवार, २२ ऑक्टोबर
वेळ : पहाटे ५:३० वा.
स्थळ : महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे
पुणे हे संगीताची परंपरा जपणारे शहर आहे. या परंपरेला उजाळा देत, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांसाठी शुद्ध, दर्जेदार आणि आनंददायी संगीत अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पं. विश्व मोहन भट्ट, विजय घाटे आणि महेश काळे यांसारखे तीन वेगवेगळ्या अंगांचे दिग्गज एका मंचावर येत आहेत, हीच या कार्यक्रमाची खरी जमेची बाजू आहे. - पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप
‘लोकमत’सोबत आमचे सांस्कृतिक बांधीलकीचे नाते आहे. संगीत हे आपल्या समाजाच्या भावनांचे प्रतीक आहे. पारंपरिक स्वरांच्या माधुर्याने ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’चा हा सोहळा अधिक रंगतदार होईल, असा आमचा विश्वास आहे. - हरीश श्रॉफ, संचालक मार्केटिंग, न्याती ग्रुप
‘लोकमत’ने अनेक वर्षांपासून सांस्कृतिक कार्यक्रमांना व्यासपीठ दिले आहे. या परंपरेला हातभार लावण्याची संधी आम्हाला मिळत आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर असा संगीत सोहळा रसिकांच्या मनात उत्साह निर्माण करणार आहे. - डॉ. सौरभ गाडगीळ, चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स
पाडव्याच्या पहाटेचा हा संगीत सोहळा म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातील एक सुंदर पर्वणी आहे. या कार्यक्रमाद्वारे रसिकांना जागतिक दर्जाचे कलाकार प्रत्यक्ष अनुभवता येतील, ही आमच्यासाठीही आनंदाची बाब आहे. - सुशील जाधव, विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य कॉ. ओप. सोसायटी