शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिका करणार २ कोटी ६६ लाखांचा खर्च        

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 6:10 PM

शहरात भटकी व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे् या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका तब्बल २ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनसबंदी, अ‍ॅटी रेबीज लसीकरण, बेल्ट, कॉलर चिप लावणारब्ल्यू क्रॉस सोसायटी आॅफ पुणे यांच्याकडून प्रतिश्वान १०३९ याप्रमाणे काम करून घेण्यास मान्यताकुत्र्यांची गणना करण्यासाठी ४ लाख ९० हजार रुपयांच्या रकमेला मान्यता

पुणे: शहरात भटकी व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे् या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका तब्बल २ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये नसंबदी शस्त्रक्रिया करणे, अँटी रेबीज लसीकरण करून या कुत्र्यांना बेल्ट, कॉलर आणि चिव लावून पकडलेली कुत्री पुन्हा त्याच जागेवर सोडण्यात येणार आहे. यासाठी खाजगी संस्थांना हे काम देण्यात आले अली असून, या संस्थेच्या कामांना मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले की, पुणे शहरातील भटकी व मोकाट कुत्र्यांचे नसबंदी शस्त्रक्रियेसाठी एडब्ल्यूबीआय मान्यताप्राप्त संस्थांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये कुत्रे सुपूर्त करणे व नसबंदी शस्त्रकियेनंतर अँटी रेबीज लसीकरण करून बेल्ट,कॉलर,चिप लावून पकडलेल्या ठिकाणी कुत्रे सोडणे आदी कामांचा समावेश आहे. यासाठी ब्ल्यू क्रॉस सोसायटी आॅफ पुणे यांच्याकडून प्रतिश्वान १०३९ याप्रमाणे काम करून घेण्यास मान्यता देण्यात आली. २०२१ पर्यंत या संस्थेकडून हे काम करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे अ‍ॅप निर्माण करणे ते विकसित करणे यासाठी चार लाख ९० हजार रुपये तसेच शहरातील कुत्र्यांची गणना करण्यासाठी दोन लाख २५ हजार कामे करून घेण्यास मान्यता देण्यात आली.पुणे मनपाने पकडलेल्या कुत्र्यांना अँटिरेबीज लसीकरण करून बेल्ट,कॉलर, चिप लावण्यासाठी प्रति श्वानाप्रमाणे संस्थेस अदा करण्यात येणार आहे. नसबंदी शस्त्रक्रिया झालेल्या कुत्र्यांना जागेवर अँटिरेबीज लसीकरण करून बेल्ट,चिप,कॉलर लावण्यासाठी प्रति श्वान १७० रुपये अदा करणे. नसबंदी झालेल्या कुत्र्यांना जागेवर अँटीरेबीज लसीकरण व कुत्र्याच्या मानेभोवती आर्थिक वर्षाप्रमाणे वेगवेगळ्या रंगाचे लसीकरण केल्याबद्दलचे बेल्ट,कॉलर,चिप लावणे यासाठी प्रति श्वान रुपये १९९ प्रमाणे संस्थेस अदा करण्यास मान्यता देण्यात आली.युनिव्हर्सल अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटीच्या प्रति श्वान १५९८ रुपये व अ‍ॅपसाठी चार लाख ९० हजार रुपये आणि कुत्र्यांची गणना करण्यासाठी ४ लाख ९० हजार रुपयांच्या रकमेला मान्यता देण्यात आली. -----शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी युनिव्हर्सल अ‍ॅनिमल वेलअ‍ॅअर, बीड, ब्ल्यू क्रॉस सोसायटी आॅफ पुणे, अ‍ॅनिमल वेलफेअर असोसिएशन, नवी मुंबई आणि सोसायटी फॉर दि प्रिव्हेन्शन आॅफ कव्हएल्टी टू अ‍ॅनिमल्स, लातूर या चार संस्थांच्या निविदेला मान्यता देण्यात आली. यामध्ये ५६० रुपये प्रति श्वान आणि सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रत्येकी ७५ हजार रुपयांना मान्यता देण्यात आली. ब्ल्यू क्रॉस सोसायटी आॅफ पुणे ही संस्था मुंढवा केशवनगर या ठिकाणी आणि अन्य तीन संस्था नायडू पॉट येथे काम करणार आहेत. हा करार तीन वर्षांसाठी आहे.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाdogकुत्रा