शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

बाह्यवळण रद्द झालेच पाहिजे

By admin | Updated: September 25, 2015 01:13 IST

मंचर शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याला शेतकऱ्यांचा असणारा विरोध कायम आहे. भूसंपादनाविरोधात घेतलेल्या हरकतींवर सुनावणी झाली, त्या वेळी ‘आम्हाला मोबदला नको

मंचर : मंचर शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याला शेतकऱ्यांचा असणारा विरोध कायम आहे. भूसंपादनाविरोधात घेतलेल्या हरकतींवर सुनावणी झाली, त्या वेळी ‘आम्हाला मोबदला नको, बाह्यवळण रद्द झाले पाहिजे,’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. या वेळी शेतकऱ्यांनी नव्याने हरकती नोंदविल्या आहेत. बाह्यवळण रस्त्याला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या होत्या. त्यावर घोडेगाव तहसील कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. उत्तर पुणे जिल्हा शेतकरी बचाव कृती समितीचे डॉ. सुहास कहडणे, सतीश बेंडे, पंडित निघोट, सचिन बाणखेले, सचिन खानदेशे, संदीप बेंडे, धीरज समदडिया, सचिन चिंचपुरे, गणेश खानदेशे आदी बाधित शेतकरी या वेळी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी नव्याने हरकती नोंदविल्या आहेत. त्यात बाह्यवळण रस्ता का नको, याबाबत म्हणणे मांडले आहे. विशेष भूसंपादन अधिकारी संजय पाटील, मंचरचे गावकामगार तलाठी हेमंत भागवत व भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी बाह्यवळण रद्द करण्याची आग्रही मागणी केली. ‘मोबदला हा आम्हाला विषयच नको आहे. कोणत्याही परिस्थितीत बाह्यवळण रद्द झालेच पाहिजे,’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. शांततेच्या मार्गाने अधिकाऱ्यांनी आमची मागणी ऐकावी तसेच बाह्यवळण रद्द करावे, असे उपस्थित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या वेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या नावाने एक निवेदन, संजय पाटील यांच्याकडे सुपूर्त केले. (वार्ताहर)