खळबळजनक! स्वत:वर गोळी झाडून घेत पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 13:51 IST2020-10-20T13:50:35+5:302020-10-20T13:51:22+5:30
शिवाजीनगर मुख्यालयातील एका कर्मचाऱ्याचा महिला कर्मचाऱ्यांशी वाद झाला होता....

खळबळजनक! स्वत:वर गोळी झाडून घेत पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील घटना
पुणे : ड्युटीवर असताना पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात मंगळवारी पहाटे घडला. यावेळी आत्महत्या करण्यासाठी गार्ड अंमलदाराची बंदुक हिसकावून घेण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यात दोघांमध्ये झटापट होऊन गार्ड अंमलदाराला गोळी लागली. जखमी कर्मचाऱ्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. हा प्रकार मंगळवारी पहाटे घडला.
शिवाजीनगर मुख्यालयातील एका कर्मचाऱ्याचा महिला कर्मचाऱ्यांशी वाद झाला होता. या महिला कर्मचाऱ्याने ड्युटी अंमलदारांकडे त्याबाबत तक्रार केली होती.त्याचा जाब या पोलीस कर्मचाऱ्याला विचारण्यात आला. त्यामुळे आपली नाचक्की झाली असे समजून त्याने तेथे ड्युटीवर असलेल्या गार्डकडील बंदुक हिसकाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. त्यावेळी ट्रिगर दाबला जाऊन गोळी उडाली. ती गार्डच्या बोटाला लागली.या गार्डला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.