शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

खळबळजनक! लग्नाला आलेल्या महिलेच्या १० तोळे सोन्यावर डल्ला; चोर निघाली 'ही' व्यक्ती   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 19:40 IST

फिर्यादी महिलेने लग्नात घालण्यासाठी १० तोळे सोन्याचे दागिने सोबत आणले होते..

ठळक मुद्देसिंहगड रस्त्यावरील घटना; १० तोळे सोने पोलिसांनी केले जप्त 

पुणे (धायरी) : सध्या सर्वत्र लगीनघाई सुरू आहे. आणि लग्न म्हटले की नटणे- थटणे आणि सोन्याचे दागिने घालून मिरवणे हे ओघाने आलेच. पण याच संधीचा फायदा घेण्यासाठी चोरटे देखील तितकेच तयारीत असतात. मात्र पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या लग्न सोहळ्यात सोन्याचेदागिने चोरीला गेल्याची घटना घडली. अन् त्यानंतर पोलिसात तपासात जे सत्य समोर आले ते पाहून सगळ्यांचीच एकच खळबळ उडाली. 

पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, खडकवासला परिसरात राहणारी ३८ वर्षीय महिला लग्नासाठी सोमवारी आली होती. आणि याच दरम्यान तिचे एक ना दोन तब्बल १० तोळे सोने लंपास झाल्याची घटना घडली. आणि कार्यक्रम स्थळी एकच खळबळ उडाली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. आणि पोलीस तपासात एक धक्कादायक खुलासा समोर आला. तो म्हणजे या महिलेचे सोने चक्क वर बापानेच लंपास केले होते. 

सिंहगड रस्ता पोलिसांनी अवघ्या चार तासांत तपास करून १० तोळे सोने जप्त केले. याप्रकरणी दत्ता दगडू गोऱ्हे (घुलेनगर, वडगांव बुद्रुक, पुणे) यांस पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत ३८ वर्षीय महिलेने सिंहगड रस्ता पोलिसांत तक्रार दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, खडकवासला परिसरात राहणारी ३८ वर्षीय महिला आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी सोमवारी वडगाव बुद्रुक परिसरात आली होती. सोमवारी हळदी समारंभ असल्याने फिर्यादी महिला ही आपल्या वडगांव बुद्रुक येथील भावाच्या घरी मुक्कामास होती. फिर्यादी महिलेने लग्नात घालण्यासाठी आपले १० तोळे सोन्याचे दागिने सोबत आणले होते. आरोपी व फिर्यादी महिलेचे घर शेजारी असल्याने हळदी समारंभासाठी फिर्यादी व त्यांच्या भावाच्या घरातील सर्वजण गेले होते. दरम्यान फिर्यादी महिलेच्या भावाच्या घराचे दार उघडे असल्याने आरोपी दत्ता गोरे हे घरात शिरून कपाटात ठेवलेले २ लाख ४४ हजार ६६५ रुपयांचे १० तोळे सोन्याचे दागिने घेऊन गेला. लग्नाच्या दिवशी सोने घालण्याच्या उद्देशाने फिर्यादी महिलेने कपाटात दागिने तपासले असता  ते चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विलास धोत्रे यांनी तपासाची चक्रे फिरवत त्यांनी अवघ्या चार तासांत आरोपी असणाऱ्या नवरदेवाच्या पित्याकडून १० तोळे सोने जप्त केले. सुरुवातीला आरोपीने स्वतःच्याच मुलाच्या लग्नात कोण चोरी करणार? अशी उडवा- उडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करीत होता.त्यावेळी पोलिसांनी ' पोलीस खाक्या ' दाखवताच त्याने गुन्हाची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त पोमजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे, पोलीस कर्मचारी विशाल गवळी, दयानंद तेलंगे यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाjewelleryदागिनेGoldसोनंtheftचोरीmarriageलग्नArrestअटक