शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Jayant Patil: सत्ता जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी सर्व काही लाडके होऊ शकते - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 16:18 IST

लोकसभेच्या निकालावरून लक्षात आले आहे की, सत्ता जाण्याची शक्यता आहे

बारामती: लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही चंद्र जरी मागितला तरी ते देण्याच्या तयारीत आहेत. असं म्हणत लाडक्या खुर्चीसाठी पडेल ते म्हणाल ते करायला तयार आहेत. कारण त्यांना लोकसभेच्या निकालावरून लक्षात आले आहे की, सत्ता जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्व काही लाडके होऊ शकते. असं म्हणत जयंत पाटलांनी (Jayant Patil) राज्य सरकारवर टीका केली आहे. शरदचंद्र पवार पक्षातर्फे आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या महावीर भवन येथे आयोजित सभेत ते बोलत होते.  

पाटील म्हणाले, पवार साहेबांच्या एकदा डोक्यात बसलं की मग काय खरं नाही. त्यांच्याकडे जिद्द एवढी प्रचंड आहे की, वयाचा अडसर त्यांच्यासमोर येत नाही. त्यांनी एकदा मनात घेतलं की, तर ते पाट लावूनच सोडतात. त्यामुळे शहाण्या माणसाने त्यांना डिवचू नये, एकदा जागं केलं,आणि आव्हान दिल की पवार साहेब ते तडीस नेतात. असा ८४ वर्षांचा योद्धा तुम्ही सर्वांनी हाताच्या फोडासारखा जपला. त्यामुळे तुम्हा बारामतीकरांचे महाराष्ट्रावर लाख मोलाचे उपकार आहेत. 

भारतीय जनता पक्षामध्ये राम राहिला नाही

महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे काम तुम्ही निवडून दिलेले महाविकास आघाडीचे शिलेदार करत आहेत. आज भारतीय जनता पक्षामध्ये राम राहिला नाही. तो राम पार्टी सोडून गेला आहे. जिथे जिथे रामाची देवळे आहेत. तिथे तिथे भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे नीतिमत्तेने वागले तर देव राहतो. मात्र अनितीचा पाठपुरावा सुरू केला. भ्रष्ट मार्गाने पुढे जायचा प्रयत्न केला. ती नीती तुम्हाला माफ करत नाही, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले, बारामतीकरांनी लोकसभेला दाखवून दिले आहे. काही योजनांचा पोहा पोहा...सुरू आहे. या योजनांची 'फोड' बारामतीकरांसारखी कोणीही करू शकत नाही. नऊ वर्ष भाऊ रोज दारावरून जातो कधीच वळत नाही आणि अचानक भाऊ दारात आला आणि म्हणाला रक्षाबंधन करतो ओवाळणी घाल. भावाने सांगावं बहिणीने काय करावे. इतके वर्ष आठवण झाली नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी बहीण लाडकी नव्हती. निवडणुकीनंतर ही जर परिस्थिती येत असेल तर काय डोळ्यासमोर ठेवून कोण निर्णय घेते हे पाहिलं पाहिजे. काहीजण म्हणतात की, विकासासाठी लोक जातात. हे आपण अनेकदा ऐकतो. आम्हाला एक कायम दरारातील आवाज ऐकायची सवय होती. वाघाच्या आवाजाचं म्याव म्याव झालं की काय...कळेना झालेय, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी नाव न घेता अजित पवार यांना टोला लगावला.

टॅग्स :PuneपुणेJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती