शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

'सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात', भरणेंचा अजब सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:04 IST

दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात एक अजब आणि वादग्रस्त विधान करून उपस्थितांचे कान टवकारले

पुणे: राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात एक अजब आणि वादग्रस्त विधान करून उपस्थितांचे कान टवकारले. महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटले की, “सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात'' त्याची माणसं नोंद ठेवतात. या विधानाने कार्यक्रमाला उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. 

महसूल दिनासारख्या गंभीर प्रसंगी कृषिमंत्र्यांकडून अशी मांडणी होणे, हे अनेकांना पचनी पडले नसावे. महसूल विभागाकडून पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा अपेक्षित असताना, मंत्र्यांनी “काम वाकडं करून परत सरळ करण्याचा” सल्ला दिल्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भरणे यांनी पुढे शेतकऱ्यांच्या तक्रारींना वेळीच न्याय मिळावा आणि योजनांचा लाभ योग्य हक्कदारांपर्यंत पोहोचावा, असेही सांगितले. मात्र त्यांच्या अजब विधानामुळे मंत्री महोदय अडचणी येण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगणार असून , कृषिमंत्री पदाची जबाबदारी नुकतीच स्वीकारलेल्या भरणे यांनी अशा स्वरूपाचे मार्गदर्शन करणे कितपत योग्य? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं 

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील सर्वांनी माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी दिली आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खात मिळते यासारखा आनंद कुठला असू शकतो. कृषी खात्याच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, शेतकऱ्यांच्या शेतीत नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवतातील यावर माझा भविष्यात प्रयत्न असणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणfarmingशेतीManikrao Kokateमाणिकराव कोकाटे