आजही दिलासा!पुण्यात नवीन कोरोना रुग्ण संख्या ३०० चा आत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 18:46 IST2021-06-08T18:45:30+5:302021-06-08T18:46:54+5:30
आज २९७ नवे रुग्ण तर १२ मृत्यू

आजही दिलासा!पुण्यात नवीन कोरोना रुग्ण संख्या ३०० चा आत
पुणे महापालिका हद्दीतील नवीन कोरोना रुग्णांची संख्या ३०० चा झाली राहिली आहे. पुणे शहरासाठी हा चांगलाच दिलासा मानला जातो आहे.
पुणे शहरात सहसा सोमवारी कोरोना रुग्णांची संख्या कमी असते. चाचण्या कमी होत असल्याने ही आकडेवारी कमी राहते.मात्र मंगळवारी देखील ही रुग्ण संख्या आटोक्यात राहिली आहे. आज शहरात एकुण २९७ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आत्ता पर्यंत चा एकुण रुग्णांची संख्या आता ४७२७२८ झाली आहे. सध्या शहरात एकुण गंभीर रूग्णांची संख्या ५८९ आहे. तर सध्या ११७८ रुग्ण ऑक्सिजन वर आहेत.
आज दिवसभरात ५२९ रुग्ण कोरोना मधून बरे झाले. तर १२ जण मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनातून आत्तापर्यंत ४६०६०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकुण मृतांची संख्या ८४२२ झाली आहे. सध्या शहरात ३६९९ सक्रिय रुग्ण आहेत.