शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

"शरद पवारही मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत, ते फडणवीसांनी दिलं होतं; आघाडीला तेही टिकविता आलं नाही.."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 12:59 PM

तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनाही ते जमले नाही...

पुणे : मराठा आरक्षणाची मागणी १९८५ पासून केली जात आहे. तेव्हापासून आजवर झालेल्या मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याची धमक दाखविली नाही. तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि ५० वर्षांची राजकीय कारकीर्द असलेले शरद पवारही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी देण्याची हिम्मत दाखविली. ते सुद्धा या सरकाराला टिकविता आले नाही. त्यामुळे आगामी काळात आरक्षणाच्या मुद्द्यावर नेमके काय करणार आहात असा सवाल माजी खासदार आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केला आहे. 

संजय काकडे यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली.  त्यापार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काकडे म्हणाले, मुख्यमंत्री मुंबईचे आणि उपमुख्यमंत्री पुण्याचे तरीही याच दोन शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव का वाढला? हे नेते फक्त सभागृहात बसून बैठका घेतात. दवाखाने, संस्था यांना भेटी देऊन मदत केली पाहिजे. अद्यापही तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी नाही. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही. प्रत्येकजण वेगवेगळ्या घोषणा करीत असतो. पहिल्या लाटेत एवढा आकडा वाढला नव्हता. यावेळी ग्रामीण भागातही संसर्ग वाढलाय. शहरी भागात पूर्णपणे लसीकरण करा असे काकडे म्हणाले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. पवारांनी सर्व पक्षांना सोबत घेऊन समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. आयएएस अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या पाहिजेत. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडावे, लोकांमध्ये फिरावे तेव्हा खरी परिस्थिती समजेल. लॉकडाऊनमुळे लोकांचे हाल सुरू आहेत. औद्योगिक पट्ट्यात पूर्ण लसीकरण केल्यास  रोजगार करता येतील.  प्रत्येक गोष्टीला केंद्र सरकारला जबाबदार धरता. मग राज्याची काही जबाबदारी आहे का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्य शासनाने ठरवले तर ७-८ हजार कोटी कोरोनवर खर्च करता येऊ शकतात. -----

शरद पवार यांची ५० वर्षांची राजकीय कारकीर्द आहे. तीन वेळा ते मुख्यमंत्री झाले. मराठा नेते म्हणून पश्चिम महाराष्ट्रातून ते उदयास आले. मराठ्यांसाठी काहीतरी करतील अशी समाजाला आशा होती. पण त्यांनाही आरक्षण देता आले नाही. कोकण, विदर्भ, मराठवाड्यात राष्ट्रवादी आहे कुठे असा प्रश्न काकडे यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेSanjay Kakdeसंजय काकडेPoliticsराजकारणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षण