पंधरा दिवस होऊनही आरोपी फरारच; कठोर कारवाई करा, अजितदादांनी पोलिसांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 04:47 PM2023-04-25T16:47:37+5:302023-04-25T16:48:27+5:30

बारामती तालुक्याला हादरून सोडणाऱ्या विनोद फडतरे खून प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडतरे कुटुंबाची भेट घेतली

Even after 15 days, the accused is absconding Take strict action Ajit pawar told the police | पंधरा दिवस होऊनही आरोपी फरारच; कठोर कारवाई करा, अजितदादांनी पोलिसांना सुनावले

पंधरा दिवस होऊनही आरोपी फरारच; कठोर कारवाई करा, अजितदादांनी पोलिसांना सुनावले

googlenewsNext

सांगवी (बारामती ) : संपूर्ण बारामती तालुक्याला हादरून सोडणाऱ्या विनोद फडतरे खून प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडतरे कुटुंबाची भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून या खून प्रकरणातील फरार झालेल्या आरोपी बाप-लेकाचा शोध घेऊन कठोर शासन करण्याच्या सूचना माळेगाव पोलिसांना केल्या आहेत. शेतात गेलेल्या विनोद हिराचंद फडतरे (वय ३०) याचा जमिनीच्या वादातून सांगवी (ता.बारामती) येथे बुधवारी (दि. १२) रोजी सकाळच्या दरम्यान चुलत भाऊ विशाल गणपत फडतरे याने दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने परिसराला हादरून सोडले होते.

फडतरे कुटुंबांनी अजित पवार यांना आमच्यावर अन्याय झाल्याचे सांगून आरोपींवर कठोर कारवाईi करण्याची मागणी केली. झालेल्या घटनेबाबत अजित पवार यांनी देखील संताप व्यक्त केला. यावेळी विनोद फडतरेच्या पत्नीस संस्थेत नोकरी देऊन,माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडून मदत मिळवून देत, विनोदच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडतरे कुटुंबाला दिले. 

खुनाच्या काही मिनिटांत विशाल गणपत फडतरे याला साक्षीदारांच्या सांगण्यावरून पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. मात्र, विशाल फडतरे याला खून करण्यास प्रवृत्त करणारा त्याचा भाऊ विक्रम गणपत फडतरे व वडील गणपत कृष्णा फडतरे अद्याप फरार आहेत. पंधरा दिवस उलटले तरी आरोपींना पकडण्यात माळेगाव पोलिसांना अपयश आले आहे. पंधरा दिवस होऊन देखील आरोपींचा तपास लागत नसल्याने अजित पवार यांनी माळेगाव पोलिसांना चांगलेच खडेबोल सुनावले.

याबाबत विनोद फडतरेच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याचे आदेश विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माळेगाव पोलिसांना दिले आहेत. पंधरा दिवस उलटून ही विनोद फडतरेच्या मारेकऱ्यांचा तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर मयत विनोद फडतरेच्या कुटुंबीयाला पाठबळ देण्यासाठी शनिवारी (दि.१५) गाव कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यासाठी संपूर्ण गाव एकवटले होते. विनोदच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली होती. त्यानंतर देखील पोलिसांनी सूत्र हलवली नसल्याचे चित्र आहे. विनोदचे मारेकरी अद्याप सापडत नसल्याने माळेगाव पोलिसांवर फडतरे कुटुंबासह ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Even after 15 days, the accused is absconding Take strict action Ajit pawar told the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.