शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

इस्रो अ‍ॅस्टोसॅट मिशन मोहिमेच्या तयारीत

By admin | Updated: August 19, 2015 00:03 IST

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान मोहिमेबरोबरच अ‍ॅस्टोसॅट मिशन, आदित्य एल १ या अंतराळ मोहिमांची तयारी सुरू केली

पुणे : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान मोहिमेबरोबरच अ‍ॅस्टोसॅट मिशन, आदित्य एल १ या अंतराळ मोहिमांची तयारी सुरू केली असून त्यासाठी राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच स्पेस प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या दिशेनेही पाऊल टाकले आहे,अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष ए.एस.किरण कुमार यांनी मंगळवारी दिली.आयुकातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्पेस एक्सप्लोरेशन’ विषयावरील व्याख्यानात किरण कुमार बोलत होते. इस्रोने राबविलेल्या विविध मोहिमांचा आढावा घेवून किरण कुमार म्हणाले, येत्या सप्टेबर महिन्यात अ‍ॅस्टोसॅट मिशन सुरू केले जाणार आहे. या मिशनसाठी आयुकासह कॅनडातील संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. चांद्रयान २ वर काम सुरू असून २०१७ ते १८ पर्यंत हे मिशन पूर्ण केले जाईल. त्याच प्रमाणे २०१८-१९ या कालावधीत आदित्य एल १ मिशन राबविले जाईल. हे मिशन पाच वर्षांसाठीचे असेल. जमिनीपासून १़५ मिलियन किमी अंतरावर आदित्य एल 1 यान सोडले जाईल. अंतराळ मोहिमांसाठी विविध संस्थांची करार केले जात आहेत.खासगी कंपन्यांनी स्पेस सायन्सच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सुरूवात केली असून इस्त्रोने जर्मनीतील एका कंपनीशी याबाबत करार केला आहे. भारतातील कंपन्यांकडूनही याबाबतचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जात आहे.असे स्पष्ट करून किरण कुमार म्हणाले, विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी इस्त्रोने विविध योजना सुरू केल्या आहेत. भौतिकशास्त्र व गणित या विषयातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जात आहेत. उपग्रह निर्मितीबाबत उपक्रम राबविले जाणा-या विद्यापीठांना किंवा शैक्षणिक संस्थांना इस्त्रोकडून निधी दिला जात आहे. त्यामुळे स्पेस सायन्स क्षेत्रातील अभ्यासक विद्यार्थ्यांनी त्याचा अधिकाधिक फायदा घ्यावा.सार्क सॅटेलाईट बाबत बोलताना किरण कुमार म्हणाले,सार्क राष्ट्रांची यासंदर्भात नुकतीच बैठक झाली. ब्रॉडकास्टींग, टेलिकम्युनिकेशन, डिझास्टर आदीसाठी सार्क सॅटेलाईटचा उपयोग होणार असून सर्व सार्क राष्ट्रांकडून आवश्यक माहितीचे लिंगिंग करण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)