भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धां

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:13 IST2021-02-05T05:13:21+5:302021-02-05T05:13:21+5:30

मराठी भाषा ही एक समृध्द आणि प्राचीन भाषा असल्याने तिचा जस्तीत जास्त वापर वाढावा, भाषेची गोडी वाढावी असे ...

Essay competitions and oratory competitions on the occasion of language conservation fortnight | भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धां

भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धां

मराठी भाषा ही एक समृध्द आणि प्राचीन भाषा असल्याने तिचा जस्तीत जास्त वापर वाढावा, भाषेची गोडी वाढावी असे मत आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित काळे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. मराठी भाषा ही दैनंदिन व्यवहारात वापरली गेली पाहिजे, असे मत सचिव ॲड. मुकुंद काळे यांनी व्यक्त केले. तर मातृभाषा ज्ञानभाषा झाली तर शिक्षण सुलभ होऊन आकलनक्षमता वाढीस चालना मिळू शकते, असे प्राध्यापक शीतल पवार यांनी सांगितले.

रेखा सैद यांनी भाषा संवर्धन हे फक्त एका दिवसासाठी किंवा पंधरावडा साजरा करण्यासाठी नव्हे, तर जगण्याची पध्दत बनून अपण आपल्या भाषेचे संरक्षण, वाढ आणि विकास करण्यास कटिबध्द झाले पाहिजे, असे सांगितले. या वेळी अरुण आवटे, माजी प्राचार्य सोपानराव मंडलिक, प्राचार्या एम. डी. खेडकर, उपप्राचार्य पी. आर. भिटे, जितेंद्र वामन, एस. एस. काळे इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीतल पवार यांनी केले, तर सूत्रसंचालन सिध्देश दरेकर आणि निकिता डोके या विद्यार्थ्यांनी केले.

Web Title: Essay competitions and oratory competitions on the occasion of language conservation fortnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.