शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कचरा वाहतूक टेंडर प्रकियेत त्रुटी

By admin | Updated: May 18, 2015 05:48 IST

कचरा वाहतुकीसाठी जेसीबी व हायवा टिपर पुरविण्याकरिता जादा रकमेचे टेंडर आल्यानंतरही प्रशासनाने रेट अ‍ॅनालिसीस घेतले नाही

पुणे : कचरा वाहतुकीसाठी जेसीबी व हायवा टिपर पुरविण्याकरिता जादा रकमेचे टेंडर आल्यानंतरही प्रशासनाने रेट अ‍ॅनालिसीस घेतले नाही. तसेच बीड कपॅसिटी मागविली नाही. दोनच निविदा उरल्यानंतर टेंडरला मुदतवाढ देणे आवश्यक असताना दिली नाही. त्यामुळे पालिकेचे नुकसान होणार असल्याने ही टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.शहरातील कचरा वाहतूक करण्यासाठी महापालिकेच्या हद्दीत व हद्दीबाहेर भाडेतत्त्वावर जेसीबी व हायवा पुरविण्यासाठी टेंडर मागविले होते. त्या वेळी आलेल्या ३ टेंडरपैकी बालाजी अर्थमूव्हर्स या कंपनीस प्रति महिना ९६ हजार ९९९ रुपये किमतीने जेसीबी तर हायवा टिपर प्रतिमहिना १ लाख ४९ हजार रुपये किमतीने पुरविण्याचे १ कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये यावर निर्णय होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही टेंडर प्रक्रियाच चुकीच्या पद्धतीने राबविल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी केला आहे.कचरा वाहतुकीचा ठेका घेण्यासाठी ३ टेंडर आले होते. त्यापैकी एकाने बयाणा रकमेची एफडीआर टेंडर उघडण्याअगोरदच बँकेत जमा केल्याने त्याला अपात्र ठरविणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता अंबरनाथ अर्थमूव्हर्स या ठेकेदारास बोलावून टेंडर उघडल्यानंतर बयाणा रकमेचा एफडीआर परत मिळाल्याची स्वाक्षरी घेण्यात आली व पुढील कार्यवाही करण्यात आली असा आरोप बालगुडे यांनी केला आहे. टेंडर काढताना आलेले दर हे ८ तासांसाठी ठरविले आहेत. डंपर कामाच्या ठिकाणी पोहोचल्यापासून तास मोजले जाणार आहेत. गाडी कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर भरण्यास वेळ लागणे स्वाभाविक आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाचे तास कमी होणार आहेत. तसेच भरलेला डंपर खाली करण्यास ८ तासांपेक्षा जास्त वेळ लागल्यास त्याचे जास्तीचे पैसे ठेकेदाराकडून आकारले जाणार आहेत. ८ तासांच्या कालावधीमध्ये डंपर किती खेपा करणार हे नमूद करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)