शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

दूरचित्रवाहिन्यांच्या गजबजाटात अवतरले ‘दूरदर्शन’चे युग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 1:38 PM

 ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘भारत एक खोज’, ‘व्योमकेश बक्षी’ अशा दर्जेदार मालिकांचा खजिना

ठळक मुद्दे९०च्या दशकातील प्रेक्षक स्मरणरंजनात रमले

नम्रता फडणीस- पुणे : दूरचित्रवाहिन्यांच्या गजबजाटात आता पुन्हा एकदा ‘दूरदर्शन’चे युग अवतरले आहे. सध्याच्या कोरोना काळात ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘भारत एक खोज’, ‘व्योमकेश बक्षी’ अशा दूरदर्शनवरच्या दर्जेदार मालिकांचा खजिना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने खुला केल्यामुळे ९०च्या दशकातील प्रेक्षक स्मरणरंजनात रमले आहेत.दूरचित्रवाहिन्यांवरून सर्वांचीच नजर आता ‘दूरदर्शन’कडे वळली आहे. आजच्या काळात विविध दूरचित्रवाहिन्यांनी मनोरंजन क्षेत्रावर आपले वर्चस्व निर्माण केले असले तरी एक काळ असा होता, की दूरदर्शनने प्रेक्षकांच्या सामाजिक अवकाशावर प्रभुत्व मिळविले होते. १५ सप्टेंबर १९५९ साली भारतात ‘दूरदर्शन’ अस्तित्वात आले. भारतीय माध्यमातील इलेक्ट्रॉनिक युगाला दूरदर्शनमुळे प्रारंभ झाला.  ‘रामायण’, ‘महाभारत’ अशा पौराणिक मालिकांनी प्रेक्षकांचे अवघे जग व्यापून टाकले.  ‘रामायण’ लागले, की रस्त्यावर शुकशुकाट होत असल्याच्या आठवणी आजही अभिमानाने सांगितल्या जातात. दूरदर्शनवर प्रसारित होणाºया ‘बुनियाद’, ‘किले का रहस्य’, ‘उडान’ यासारख्या दर्जेदार मालिकांमुळे प्रेक्षक वर्ग आपोआपच निर्माण होत गेला. मात्र, ९०च्या दशकानंतर जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर खासगी वाहिन्यांनी मनोरंजन क्षेत्रात शिरकाव केला आणि त्यानंतर हळूहळू दूरदर्शनकडे लोकांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली. मात्र, सध्याच्या कोरोना काळात ‘होम क्वारंटाईन’ झालेल्या मंडळींसाठी दूरदर्शनच्या खजिन्यातील अभिजात मालिकांचा नजराणा प्रेक्षकांसमोर खुला झाल्याने साठी-सत्तरीच्या दशकातील प्रेक्षक  ‘नॉस्टेल्जिक ’ झाले आहेत.सोशल मीडियावर अनेक जण आनंद व्यक्त करणाºया पोस्ट शेअर करीत आहेत. नवीन पिढीदेखील या मालिकांचा आनंद घेत आहे. या सुवर्णकाळाविषयी ‘मुंबई दूरदर्शन’चे माजी निर्माते अरुण काकतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘‘आम्ही दूरदर्शनवर ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ हा कार्यक्रम करायचो. विविध क्षेत्रांमधील मान्यवर व्यक्तींशी संवाद साधला जायचा. ‘शब्दांच्या पलीकडे’ कार्यक्रमात आम्ही पं. जितेंद्र अभिषेकी यांचा कार्यक्रम करणार होतो; पण दिल्लीचे ट्रान्समिशन लांबले आणि पंडितजींचा कार्यक्रम सुरू होण्यास विलंब लागला. दहाचा कार्यक्रम म्हणून ते नऊ वाजता येऊन बसले. कार्यक्रम ११ वाजता सुरू झाला; पण पंडितजी काही बोलले नाहीत.’’..........मंत्र, यंत्र आणि तंत्र ही त्रिसूत्री महत्त्वाचीदूरदर्शनवर पहिल्यांदा ‘महाश्वेता’ कार्यक्रम सादर झाला होता. आमचे केशव केळकर एक निर्माते होते. तेव्हा ते नेहमी सांगायचे. मंत्र, यंत्र आणि तंत्र ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. कटेंट चांगला असेल तर यंत्र आणि तंत्र त्याला मदत करतात. जे कार्यक्रम सर्व कुटुंब एकत्र बसून लाभ घेऊ शकतील, असे असले पाहिजेत. निवेदक यादेखील घरच्या वाटल्या पाहिजेत. कार्यक्रम लोक बाहेर जाऊन बघतील ते दाखवायचे नाही, असे आम्हाला सांगितले जायचे. आताच्या पिढीला दूरदर्शनचे तंत्रज्ञान कदाचित जुने वाटू शकेल; पण मालिकांचा दर्जा हा उत्कृष्ट होता. सेलिब्रिटी म्हणून कुणाच्याही डोक्यात हवा गेलेली नव्हती. सगळ्यांसाठी हे माध्यम नवीन होते. आम्ही निर्मित केलेल्या कार्यक्रमांचेही पुन:प्रक्षेपण व्हायला हवे.

टॅग्स :PuneपुणेTelevisionटेलिव्हिजनMediaमाध्यमे