पर्यावरणाचा संदेश, झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 00:36 IST2018-08-27T00:36:06+5:302018-08-27T00:36:45+5:30
शारदाबाई पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिवनगरच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी १ मीटर व्यासाची राखी झाडाला बांधून रक्षाबंधन साजरे केले.

पर्यावरणाचा संदेश, झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे
सांगवी : शारदाबाई पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिवनगरच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी १ मीटर व्यासाची राखी झाडाला बांधून रक्षाबंधन साजरे केले. निसर्गामध्ये झाड किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते, त्याची किती आवश्यकता आहे. याची जाणीव सर्वांनाच आहे. प्रत्येक झाड जगले पाहिजे, झाडाचे संवर्धन झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य व्ही. पी. पवार यांनी केले. या वेळी सजीव सृष्टीचे रक्षण करणाऱ्या निसर्गाला मानवजातीच्या रक्षणाचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थिनींनी झाडाला राखी बांधून भाऊ मानून, तुझी आम्हाला गरज असल्याचे मत व्यक्त केले.
राष्ट्रीय हरित सेना विभाग शारदाबाई पवार महाविद्यालयामार्फत असे विविध उपक्रम हाती घेऊन निसर्ग संवर्धनाविषयी जनजागृती करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात येतो. राष्ट्रीय हरित सेना विभागामार्फत झालेल्या या रक्षाबंधनाप्रसंगी प्राचार्य व्ही. पी. पवार, उपप्राचार्य एम. एस. सोनवलकर, पर्यवेक्षक उत्तम तावरे, हरित सेनेचे एस. एस. माने, मार्गदर्शक एन. डी. कुंभार, ए. व्ही. काटे, सी. बी. जगताप, एच. एन. जगताप,
शिक्षक प्रतिनिधी आर. व्ही. माळवदे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी झाडांना बांधल्या राख्या
काºहाटी : येथे वसतिगृह विद्यालयात विद्यार्थी- विद्यार्थिनींनी वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधनाचा दिवस साजरा केला. भविष्यात मानवाच्या रक्षणासाठी जीवसृष्टी वाचवण्याची गरज असल्याने व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वटवृक्ष लागवड करून व असणाºया झाडांची काळजी घेऊन त्यांचे रक्षण करण्याची गरज आहे. वृक्षांचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थी व शिक्षकांनी वृक्षांना राख्या बांधण्याचा आगळावेगळा उपक्रम साजरा केला. यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य यू. एम. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मानवाचे रक्षण करणाºया निसर्गाचे रक्षण करण्याचे आवाहन केले. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.