उद्योजिका उषा काकडे यांना विषबाधा; काही तासांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 22:50 IST2025-03-08T22:47:23+5:302025-03-08T22:50:16+5:30
दोन ते तीन तासांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

उद्योजिका उषा काकडे यांना विषबाधा; काही तासांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : उद्योजिका उषा काकडे यांनी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या शनिवारी विविध माध्यमांवर प्रकाशित झाल्या. रुग्णालय प्रशासनाकडून मात्र उषा काकडे यांना विषबाधा (फूड पॉयझनिंग) झाल्याचे सांगण्यात आले. काही तासांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज दिल्याचेही खासगी रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे या गंभीर अवस्थेत असल्याची गोपनीय माहिती पुणे पोलिसांना शनिवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास मिळाली. त्यानंतर वरिष्ठांनी तत्काळ माहितीबाबत खात्री करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. त्यानुसार एक टीम सायंकाळी साडेचारच्या सुमारास काकडे यांच्या राहत्या घरी पोहोचली. काकडे अस्वस्थ अवस्थेत आढळल्या. त्यांना तत्काळ केअरटेकर व नोकरांसह वाहनात बसवून खासगी रुग्णालयात पाठविले. दोन ते तीन तासांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
दरम्यान, या प्रकरणावर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असून, आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.