शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By admin | Updated: June 13, 2015 04:48 IST

सिंहगड रस्त्यावर वडगाव पुलावर, गुरुवारी (दि. ११) झालेल्या अपघातात ८ निष्पापांचा बळी गेला. १ आॅक्टोबर २०१० पासून कात्रज देहूरोड मार्गावर ६

पुणे : सिंहगड रस्त्यावर वडगाव पुलावर, गुरुवारी (दि. ११) झालेल्या अपघातात ८ निष्पापांचा बळी गेला. १ आॅक्टोबर २०१० पासून कात्रज देहूरोड मार्गावर ६ पदरीकरणाचे काम सुरू आहे. ३१ मार्च २०१३ ला संपणे अपेक्षित असलेल्या या कामाला झालेल्या २.५ वर्षांच्या विलंबामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असून या दिरंगाईस जबाबदार असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाने पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्याकडे केली आहे. रस्त्यांच्या या कामाच्या दिरंगाईमुळे आजपर्यंत दीडशेजणांचे बळी गेले असल्याचेही वेलणकर यांनी मागणीत नमूद केले आहे. या रस्त्यावर २० अपघातप्रवण जागा असल्याचे वाहतूक पोलिसांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून वारंवार कळविण्यात येत आहे. मात्र. त्या मागणीनुसार, केवळ कंत्राटदाराला खलिते पाठविण्याशिवाय महामार्ग प्राधिकरणाने काहीही केले नाही. त्यामुळे प्राधिकरण व कंत्राटदार या दोघांच्या बेजबाबदारपणा व दुर्लक्षपणामुळेच प्राणघातक अपघातांची मालिका सुरू आहे. किमान आता तरी आपण जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी आमची मागणी आहे. तसेच वाहतूक नियंत्रण सोडून रस्त्याच्या कडेला फक्त असंघटित दुचाकीस्वारांची शिकार करणाऱ्या आणि चारचाकी गाड्यांच्या काळ्या काचांवर कारवाई करून पुरुषार्थ गाजविणाऱ्या परंतु अनधिकृत वाहतुकीकडे अनधिकृत थांब्यांकडे, ओव्हरलोड जड वाहनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक पोलिसांवरही कारवाई करावी, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे यांनी केली आहे.