शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात वर्षाविहाराचा आनंद! पर्यटकांसाठी खुशखबर; लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 12:29 IST

पर्यटकांसाठी पावसाळ्यात सर्वाधिक आकर्षणाची शहरे लोणावळा खंडाळा तर वर्षाविहारासाठी भुशी डॅम

लोणावळा : पर्यटकांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे की, लोणावळ्यात भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. लोणावळा खंडाळा ही शहरे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. व येथील भुशी धरण हे पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण आहे. धरणाच्या सांडव्यावरुन वाहणार्‍या पाण्यात बसून वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक लोणावळ्यात येत असतात. धरणाच्या सांडव्याला लागून पायर्‍या असून या पायर्‍यांवरुन धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी वाहत असते. लोणावळ्याचे भुशी धरण ओव्हरफ्लो झाले की खर्‍या अर्थाने पावसाळी पर्यटनाला सुरुवात होते. अनेक देश विदेशातील पर्यटक धरणाच्या पायर्‍यांवर बसण्याचा व या परिसरातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.     30 जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भुशी धरण ओव्हरफ्लो झाले व परिसरातील व्यावसायकांनी जल्लोष केला. कारण पावसाळी सिझनच्या चार महिने व्यावसायावर येथील नागरिकांचे वार्षिक अर्थचक्र अवलंबून असते. शनिवारी सकाळीच धरण भरल्याची गोड बातमी समजल्याने शनिवार व रविवार दोन्ही दिवस धरणावर पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.    पर्यटकांनी पर्यटनस्थळांवर वर्षाविहाराचा आनंद घेताना काळजी घ्यावी, कोणतीही दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घ्या, महिला, मुले व वयस्कर यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, वाहने चालविताना सावकाश चालवा, रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्या अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन वजा इशारा सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक व शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेlonavalaलोणावळाRainपाऊसenvironmentपर्यावरणNatureनिसर्गSocialसामाजिक