शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत शिक्षण मंडळाची इंग्रजी शाळा

By admin | Updated: June 13, 2015 04:37 IST

बारामती नगरपालिकेच्या शिक्षण मंडळामार्फत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नाला आज यश येणार आहे. आज नगरपालिकेच्या सर्वसाधारण

बारामती : बारामती नगरपालिकेच्या शिक्षण मंडळामार्फत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नाला आज यश येणार आहे. आज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण मंडळाने सादर केलेल्या संभाव्य वार्षिक ५ लाख ३२ हजार ५०० रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. अंदाज पत्रकात आर्थिक तरतूद नसल्यामुळे शिक्षण मंडळाच्या प्रयत्नाला ‘खो’ बसणार, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. नगरपालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी याबाबत तरतूद करावी, अशी सूचना केली. त्यानुसार आजच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. मागील २ वर्षांपासून शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माधव जोशी, उपाध्यक्ष पराग साळवी, प्रशासन अधिकारी महेश पवार यांनी प्रयत्न केले होते. मात्र, आर्थिक तरतुदीमुळे हा विषय मागे पडत होता. नर्सरी ते एचकेजी पर्यंतचे इंग्रजी माध्यमाचे वर्ग, त्याचबरोबर आठवी ते दहावीचे माध्यमिक विद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण मंडळाने दिला होता. मात्र, सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्यात येईल, असे पत्र मुख्याधिकाऱ्यांनी शिक्षण मंडळाला दिले होते.याबाबत ‘लोकमत’ने ‘अंदाजपत्रकात तरतूद नसल्याने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणे अशक्य; शिक्षण मंडळाच्या प्रयत्नाला खो’ असे वृत्त १९ मे रोजी प्रसिद्ध केले होते.