शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
6
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
7
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
8
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
10
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
11
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
12
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
14
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
15
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
16
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
17
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
18
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
19
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

महाशिवरात्रीपूर्वी भीमाशंकरमधील हटवणार अतिक्रमणे; प्रांत अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 12:25 IST

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दि. १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्र यात्रेपूर्वी भीमाशंकरमधील सर्व अतिक्रमणे काढली जावीत; यासाठी खेड व आंबेगावच्या तहसीलदारांनी अतिक्रमणांची यादी करून तत्काळ नोटिसा बजावाव्यात, अशा सूचना प्रांत अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

ठळक मुद्देतहसीलदारांनी अतिक्रमणांची यादी करून तत्काळ नोटिसा बजावाव्यात : आयुष प्रसादअतिक्रमण काढूनही पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर होणार कडक कायदेशीर कारवाई

घोडेगाव : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दि. १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्र यात्रेपूर्वी भीमाशंकरमधील सर्व अतिक्रमणे काढली जावीत; तसेच मंचर व भीमाशंकर व राजगुरुनगर-भीमाशंकर या रस्त्यावरील देखील अतिक्रमणे काढावीत. यासाठी खेड व आंबेगावच्या तहसीलदारांनी अतिक्रमणांची यादी करून तत्काळ नोटिसा बजावाव्यात. दि. ५ फेब्रवारी रोजी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना प्रांत अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.घोडेगाव येथे पंचायत समिती हुतात्मा बाबू गेणू सभागृहात भीमाशंकर महाशिवरात्र यात्रेची नियोजन बैठकीत झाली. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, कार्यकारी विश्वस्त सुनील जोशी, उपकार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडीलकर, दत्तात्रय कौदरे, रवींद्र शिर्के, अ‍ॅड. विकास ढगे, अण्णा गोरडे, सुनील देशमुख, प्रशांत काळे, पंचायत समिती सभापती उषा कानडे, उपसभापती नंदा सोनावले, तहसीलदार रवींद्र सबनीस, उपअभियंता एल. टी. डाके, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, सहायक पोलीस  निरीक्षक दत्तात्रय दराडे आदी उपस्थित होते. या वेळी बैठकीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी अनेक धडाकेबाज सूचना दिल्या. महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अतिक्रमण केलेल्यांची नावे निश्चित करून त्या सर्वांना नोटिसा बजवाव्यात. नोटीस देऊनही अतिक्रमण काढले नाही, तर  दि. ५ व १० फेब्रुवारी रोजी अतिक्रमण काढण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा; तसेच अतिक्रमण काढूनही पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. अतिक्रमण काढताना मी स्वत: हजर राहिल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :BhimashankarभीमाशंकरMancharमंचरPuneपुणे