महाशिवरात्र यात्रांची तयारी जय्यत

By Admin | Published: February 24, 2017 06:47 AM2017-02-24T06:47:49+5:302017-02-24T06:47:49+5:30

या तालुक्यातील बाळकापरा येथील शिवमंदीर परीसरात महाशिवरात्रीला भरणाऱ्या यात्रेची

Jayash is preparing for the journey of Mahashivratra | महाशिवरात्र यात्रांची तयारी जय्यत

महाशिवरात्र यात्रांची तयारी जय्यत

googlenewsNext

जव्हार : या तालुक्यातील बाळकापरा येथील शिवमंदीर परीसरात महाशिवरात्रीला भरणाऱ्या यात्रेची जय्यत तयारी सुरु आहे. शिवमंदीरासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूने व आजूबाजूच्या परीसरात छोटी छोटी दुकाने लावण्याकरीता मंदीर ट्रस्टच्या वतीने तात्पुरते लाकडी शेड उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. या जत्रेला लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. दर्शन घेण्यासाठी पहाटे ५.०० वा. पासून मोठी गर्दी उसळते, दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात.
जव्हार शहरापासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर व डहाणू मार्गावर हे मंदिर आहे. अबाल वृद्ध आपल्या कुटुंबियांसमवेत यात्रेत पायी सहभागी होतात. जत्रेमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक नवस फेडतात. बाजरात दुकाने लावण्याकरीता किरकोळ विक्रेते व घाऊक विके्रते मालाचा भरपूर साठा करून ठेवतात, लाखोंच्या संख्येने भाविक येत असल्यामुळे विक्रीही तेवढीच होत असते, या स्टॉलमध्ये खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर जास्त गर्दी उसळते, बहुतेक भक्त पायी येत असल्याने जेवणावर आणि नाश्त्यांवर चांगलाच ताव मारला जातो. बाहेरगावचे भक्त मात्र एस.टी.चा किंवा काळ्या-पिवळीचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. तर स्वत:च्या वाहनातूनही हजारो भक्त येतात. त्यांच्या वाहनासाठी तळही उभारला जातो. यात्रा शांततेत पार पडावी यासाठी मंदिर प्रशासन, जिल्हा प्रशासन पोलीस तसेच गृहरक्षक दल यांनी पुरेपूर दक्षता घेतलेली आहे. समाजसेवी संस्थांनी भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे. (वार्ताहर)

कपिलेश्वर मंदिर सजले

तलासरी : दापचरी दुग्ध प्रकल्पातील कपिलेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री साठी जय्यत तयारी सुरु असून महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या सोयीसाठी नवयुवक मंडळाचे कार्यकर्ते श्रीकांत कुलकर्णी, भूषण मयेकर, जयदेव कोठारी, विजय माशालकर, प्रशांत राजगिरे इत्यादी सह ग्रामस्थ झटत असून यात्रेचे नियोजन करीत आहेत दापचरीत महाशिवरात्री निमित्त मोठी जत्रा भरते तसेच येथे मंडळाच्या वतीने क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात, महाशिवरात्री पर्यंत या क्र ीडा स्पर्धा सुरु असतात येथील कपिलेश्वर महादेव मंदिर पुरातन असून जागृत आहे महाशिवरात्रीला येथे हजारो भाविक दर्शनाला येतात. त्यांच्या सोयीसाठी येथील नवयुवक मंडळाचे कार्यकर्ते सज्ज आहेत. (वार्ताहर)


नागझरी व कावळे मंदिर सज्ज
विक्रमगड : तालुक्यातील प्राचीन व निसर्गरम्य अशा नागझरी व कावळे येथील महादेवाची मंदीरे महाशिवरात्रीसाठी सज्ज झाली आहे. परीसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात नागझरी हे प्राचीन व पौराणिक मंदिर आहे तर कावळे येथे बालकनाथ बाबांमुळे पावन झाले आहे. सकाळपासून भजन, किर्तन सुरू राहणार आहे.
विरार येथे कार्यक्रम
विरार : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्राच्या विरार शाखेच्या वतीने शुक्र वारी सकाळी ८ पासून श्रीदत्त मंदिर, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात महाशिवरात्र उत्सवाला प्रारंभ होईल. सकाळी ८ वाजता भूपाळी आरती, ८.१५ ते १०.१५ अभिषेक, १०.३० वाजता नैवैद्य आरती, ११ नंतर रु द्र पठण, सायं ५:३० वा. सामुदायिक बिल्व पेत्र अर्पण, सायं ६:३० वा. नैवैद्य आरती ७ वा. होईल.

महाशिवरात्रीनिमित्त तुंगारेश्वर पर्वतावर उत्सव, धार्मिक कार्यक्रम
वसई : महाशिवरात्रीनिमित्ताने तुंगारेश्वर पर्वतावर असलेल्या पुरातन महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने सरकारी यंत्रणाही सज्ज झाली आहे. गुरुवारी भजन आणि किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर रात्री १२ वाजता अभिषेक केल्यानंतर महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात केली जाणार आहे.

शुक्रवारी बालयोग सदानंद महाराज किर्तन करणार आहेत. तर दिवसभर भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे. यावेळी लाखो भाविक येत असल्याने एसटी महामंडळ आणि वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाने वसई स्टेशन पश्चिम ते तुंगार फाटा आणि नालासोपारा स्टेशन ते तुंगार फाटा दरम्यान खास बसेसची सोय केली आहे.
जंगलात आग लागणार नाही, प्लॅस्टीकचा कचरा साचणार नाही आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची भाविकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन तुंगारेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Jayash is preparing for the journey of Mahashivratra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.