शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

राम नदीला अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: May 23, 2015 00:37 IST

राम नदीच्या पात्रात येथील बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात राडारोडा व भराव टाकला आहे, तसेच काही ठिकाणी वॉल कंपाऊंड टाकून नदीचा नैसर्गिक प्रवाह अडविण्यात आला आहे.

पुणे : राम नदीच्या पात्रात येथील बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात राडारोडा व भराव टाकला आहे, तसेच काही ठिकाणी वॉल कंपाऊंड टाकून नदीचा नैसर्गिक प्रवाह अडविण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात बावधन परिसराला पुन्हा पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, असा अहवाल मुळशी तहसीलदार व पाटबंधारे विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. या अहवालाची गंभीर दखल घेऊन ही अतिक्रमणे त्वरित काढून टाकण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जागेच्या वाढत्या भावामुळे पुणे शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात टेकड्या, ओढे-नाले आणि नद्यांवरदेखील अतिक्रमणे झाली आहेत. पुणे शहराच्या पश्चिमेला असलेल्या राम नदीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. स्थानिक राजकर्त्यांच्या आशीर्वादाने राम नदीवर अनेक लहान-मोठ्या बिल्डरांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे राम नदीचे अस्तित्व नाहीसे झाले असून, केवळ कागदोपत्री येथे नदी असल्याचे दिसत आहे. नदीच्या दोन्ही तीरावर बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या भिंती आणि मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे नदीचे ओढ्यात रूपांतर झाले आहे.1राम नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण करून राडारोडा टाकल्यामुळे २०१० मध्ये झालेल्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे येथील रानवारा सोसायटीसह अन्य काही सोसायट्यांमध्ये ६ ते ७ फुटांपर्यंत पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर मुळशी तहसीलदार, उपअधीक्षक भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी, पाटबंधारे विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी राम नदीपात्रात झालेल्या अतिक्रमणांची प्रत्यक्ष पाहणी केली. 2यात अनेक मोठ्या व नामांकित बिल्डरांसह हॉटेल व्यावसायिकांनी राम नदी पात्रात अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले. यात प्रामुख्याने एका डेव्हलपर्सने नदीच्या पात्रातच डबर आणि मातीचा भराव टाकल्याचे निदर्शनास आले. याशिवाय काही व्यावसायिकांनी नदीपात्रातच संरक्षक भिंत बांधल्याचे निदर्शनास आले. ही अतिक्रमणे न हटविल्यास येणाऱ्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन निवासी प्रकल्पामध्ये पाणी शिरण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा अहवाल दिला आहे.3या अहवालाची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा २००५ नुसार अतिक्रमण केलेल्या सर्व लोकांना नोटिसा दिल्या असून, अतिक्रमणे त्वरित काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी येत्या पंधरा दिवसांत अतिक्रमण न काढल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.