शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांची माहिती दडवली

By admin | Updated: January 29, 2015 23:39 IST

कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगीक वसाहतीतील कारगील इंडिया कंपनीतील कामगारांची माहिती दडवल्याप्रकरणी कंपनीतील दोन अधिकाऱ्यांसह ६ कामगार ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले

दौंड : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगीक वसाहतीतील कारगील इंडिया कंपनीतील कामगारांची माहिती दडवल्याप्रकरणी कंपनीतील दोन अधिकाऱ्यांसह ६ कामगार ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी दिली. कारगील कंपनीचे मॅनेजर विजय कामत (रा. वानवडी, पुणे), सुपरवायझर सुनिल भंडारी (रा. टाकळी खंडेश्वर ता. कर्जत, जि. अहमदनगर), कामगार ठेकेदार निवृत्ती कांबळे (रा. कुरकुंभ, ता. दौंड), राजेंद्र मलबारे (रा. केडगाव, ता. दौंड), विनयकुमार मिस्त्रा (रा. ताडीवाला रोड, पुणे), तुळशीराम पांडे (रा. कुरकुंभ, ता. दौंड), नागेंद्र प्रभु (रा. कुरकुंभ, ता. दौंड), विलास वायाळ (रा. बिरोबावाडी, ता. दौंड) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत छोट्या मोठ्या ७५ कंपन्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीच्या पार्श्वभुमीवर कंपनीतील काम करणाऱ्या कामगारांची माहिती दौंड पोलिसांनी मागवली होती. परप्रांतीय तसेच अन्य जिल्ह्यातील काही कामगार गुन्हे करुन निघुन जातात़ सध्याच्या परिस्थितीत दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मालमत्तेच्या गुन्ह्यात वाढ झालेली आहे. तेव्हा खबरदारीचे उपाय म्हणुन औद्योगीक वसाहतीतील कंपन्यांना कामगार पुरविणारे ठेकेदार तसेच कंपन्यातील अधिकाऱ्यांची २४ डिसेंबर २०१४ रोजी दौंड पोलीस स्टेशन मध्ये बैठक बोलावली होती़ या बैठकीत कंपनीतील कामगारांची माहिती तसेच त्यांचे चारित्र्य पडताळणी करुन घेण्याच्या सुचना संबधितांना पोलिसांनी दिल्या होत्या. तसेच कारगील कंपनीत २४ ठेकेदारांकडून परप्रांतीय आणि राज्यातील ८६८ कामगार पुरविण्यात आले होते.