शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण? तालुका पोलिस ठाण्यात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 21:25 IST

रुग्णांना जीवनदान देणारे डाॅक्टर घडविणाऱ्या या महाविद्यालयातच हा प्रकार घडल्याने येथील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

बारामती :बारामती एमआयडीसीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात औषध निर्मात्याला सहायक प्राध्यापकाकडून मारहाण केल्याची तक्रार बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. रुग्णांना जीवनदान देणारे डाॅक्टर घडविणाऱ्या या महाविद्यालयातच हा प्रकार घडल्याने येथील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रुग्णालयातील औषध निर्माता किशोर पारधी यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सहायक प्राध्यापक डाॅ. राजेश मैलागिरे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (दि. ११) रोजी पारधी हे तात्पुरता पदभार असलेल्या डाॅ. राजेश मैलागिरे यांच्या दालनात चर्चेसाठी गेले.डाॅ. मैलागिरे यांनी सध्या मला वेळ नाही, बाहेर निघ असे सांगितले. मी परत केव्हा येऊ अशी विचारणा पारधी यांनी केली. त्यावर मैलागिरे यांनी त्यांना शिवी दिली. याबाबत पारधी यांच्या अंगावर धावून येत डाॅ. मैलागिरे यांनी त्यांना हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे यावेळी तेथे विभागप्रमुख डाॅ. राजेश हिरे, अमित पटवर्धन, राजेश दळे, सुधीर वनारसे हे उपस्थित असताना त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.वैद्यकीय महाविद्यालय ‘अजित पवार’ यांच्या रडारवर....उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवेबाबत काही पदाधिकाऱ्यांनी देखील थेट तक्रारी केल्या आहेत. बारामतीत सप्टेंबरमध्ये झालेल्या जनसन्मान यात्रेत पवार यांनी या तक्रारीचा उल्लेख केला. याबाबत आपण लक्ष घालणार आहोत. माझ्या मायमाउलींना दिलेल्या सुविधा मिळत नसतील,तर माझ्या कानावर घाला,त्यात दुरुस्ती करु,असा इशारा त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला होता.त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार हे विधानसभा निवडणुकीत व्यस्त झाले. महाविद्यालयात झालेला प्रकार पवार यांच्यापर्यंत पोहचणार असल्याने पवार काय भूमिका घेतात,याकडे लक्ष लागले आहे. यापूर्वी देखील महाविद्यालयाबाबत आलेल्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी महाविद्यालयाच्या रुग्णालयाचे ‘स्टिंग ऑपरेशन’ केले होते.रुग्णांना अरेरावीची भाषारात्री शासकीय रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्ण आल्यास डाॅक्टर उपलब्ध नसतात. त्यांना किरकोळ औषधे देऊन मार्गी लावले जाते. अशिक्षित रुग्णांना अरेरावीची भाषा वापरली जाते,असा अनुभव आल्याची माहिती बारामती येथील आण्णासाहेब शितोळे देशमुख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. रुग्णांना लिहून दिलेली औषधे, इंजेक्शन्स, गोळ्या बाहेरून आणायला सांगितले जाते, असे शितोळे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान,बाहेरुन औषध खरेदी करण्यास सुचविण्यामागे काही मंडळींचा असलेला ‘इंटरेस्ट’ यामुळे चर्चेत आहे. सर्वसामान्य रुग्णांना ती बाहेरून विकत घेण्याची वेळ का येते,याबाबत चाैकशी होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBaramatiबारामतीcollegeमहाविद्यालयAjit Pawarअजित पवार