शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हाॅटेलवर एसटी प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करा; अन्यथा कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:55 IST

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची महामार्गावरील हॉटेल थांब्यांना अचानक भेट

पुणे :महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून महामार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी काही हाॅटेलबरोबर करार केला आहे. यामुळे चहा, जेवणासाठी बस हाॅटेलवर थांबविण्यात येते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पंढरपूर दौऱ्यावर असताना पुणे-सोलापूर महामार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना अचानक भेट दिली. यावेळी महिला प्रवाशांनी प्रसाधनगृहाच्या अस्वच्छतेबाबत तक्रार नोंदवली. ही प्रसाधनगृहे तातडीने दुरुस्त करा; तसेच आढळलेल्या इतर त्रुटी विहीत वेळेत दूर करा, अन्यथा हा हॉटेल थांबा नाईलाजाने रद्द करण्यात येईल, असे निर्देश त्यांनी दिले.

एसटी हाॅटेल थांब्यावर अन्नपदार्थ ताजे आहेत का? अन्नपदार्थ वाजवी दरात मिळतात का? तसेच महामंडळाची नाश्ता योजना चालू आहे का? याची चौकशी केली. याबरोबरच तेथील प्रसाधनगृहाची देखील त्यांनी आवर्जून पाहणी केली. दरम्यान, भिगवणजवळील एका अनधिकृत हॉटेल थांब्यावर एसटीच्या अनेक बसेस थांबलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तेथे भेट देऊन पाहणी केली असता, अत्यंत अस्वच्छ वातावरणात प्रवाशांना जेवण वाढले जात असल्याचे त्यांना दिसून आले. याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, असे एसटीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

भिगवणला लवकरच नवे बसस्थानक

भिगवण बसस्थानकात असलेल्या असुविधांबाबत स्थानिक रहिवाशांनी कैफियत मांडली. महामार्गामुळे हे बसस्थानक सखल भागात गेल्याने पावसाळ्यात पाणी साचून अत्यंत गैरसोय होते. तसेच येथील सध्या वापरात असलेली प्रसाधनगृहेदेखील अत्यंत तकलादू व अस्वच्छ असतात, अशा तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली. याबाबत महामंडळाच्या बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन यांच्याशी संवाद साधून नव्या प्रशस्त भिगवण बसस्थानकाची निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या.

टॅग्स :Puneपुणेpratap sarnaikप्रताप सरनाईकpassengerप्रवासीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड