शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

पिंपरी चिंचवडमध्ये अकरा तासांनी आनंद सोहळ्याची सांगता 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 3:00 AM

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या . . .अशा जयघोषात, ढोल ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या निनादात, फुलांची उधळण करीत, सुमारे अकरा तासांच्या मिरवणुकीने उद्योगनगरी मध्ये  गणरायाला निरोप देण्यात आला .

पिंपरी चिंचवड, दि. 6 - गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या . . .अशा जयघोषात, ढोल ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या निनादात, फुलांची उधळण करीत, सुमारे अकरा तासांच्या मिरवणुकीने उद्योगनगरी मध्ये  गणरायाला निरोप देण्यात आला .  डीजे  आणि गुलाल विरहित मिरवणूक यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्टय़ होते. 

पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतील सर्वात महत्त्वाची, आणि वैशिष्टय़पूर्ण अशी गणेश विसर्जन मिरवणूक चिंचवड परिसरातून  निघत असते . चिंचवडमधील  पवना नदी  घाटावर सकाळी सात वाजल्यापासूनच घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात येत होते. दुपारी अडीच नंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका चिंचवडमधील चापेकर चौकात येऊ लागल्या. दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री नटरंग फेम सोनाली कुलकर्णी यांनी निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव येथे  घरगुती गणपतीचे विसर्जन केले.  यावेळी  तिला पाहण्यासाठी मोठया प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती.   सायंकाळी साडेसात पर्यंत मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांचे प्रमाण अत्यल्प होते . साडेआठनंतर मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे चौकात येऊ लागली .ढोल ताशांच्या निनादात, पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटात अपूर्व उत्साह दिसून आला . मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेश परिधान केलेल्या महिला पुरुष आधी भक्त सहभागी झाले होते त्याचबरोबर फुगडीचे खेळ रंगले होते.  डीजे आणि गुलाल विरहित मिरवणूक यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्टय़ होते तसेच मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .

 चाफेकर चौकामध्ये पुणे पोलिस आयुक्तालय तसेच पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता . महापौर नितीन काळजे आमदार लक्ष्मण जगताप, आयुक्त श्रावण हर्डीकर, सह आयुक्त दिलीप गावडे 'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर तसेच चिंचवड परिसरातील नगरसेवकांनी गणेशभक्तांचे स्वागत केले . गुलाला ऐवजी फुलांचा वापर अधिक प्रमाणात दिसून आला त्याचबरोबर मोहक फुलांचे रथ लक्ष वेधून घेत होते . तसेच मावळ मुळशी परिसरातील ढोल ताशा पथकांचा सहभाग लक्षणीय होता.  

विविध शैक्षणिक, ऐतिहासिक , सामाजिक संदेश देणारे जिवंत हलते देखावे मंडळांनी तयार केले होते . रात्री साडेदहानंतर चौकांमध्ये येणाऱ्या चारही बाजूंकडून मोठ्या प्रमाणावर मंडळे आली . हा मंगलमय सोहळा  डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गणेशभक्तांची गर्दी झाली होती . या आनंद सोहळ्यांमध्ये सेल्फी घेण्यासाठी ही लगबग सुरू होते. रात्री बारापर्यंत अठ्ठेचाळीस मंडळांनी विसर्जन केले तर बारानंतर आठ मंडळांनी विसर्जन केले . 

रात्री बारानंतर स्पीकरला बंदी असल्याने मिरवणुकीतील ढोल ताशांचा दणदणाट थांबला . सुमारे अकरा तासांनी म्हणजेच रात्री दीड वाजता  या आनंद सोहळ्याची सांगता झाली . पोलीस मित्र संघटना, पोलीस नागरिक मित्र, संस्कार प्रतिष्ठान , नागरी हक्क कृती समिती प्राधिकरण समिती आदी सामाजिक कार्यकर्त्यांनीही आनंद सोहळा चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी मदत केली . मूर्तीदान उपक्रमाला ही मोठ्या प्रमाणावर गणेशभक्तांनी प्रतिसाद दिला .

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनPuneपुणे