शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
3
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
4
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
5
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
6
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
7
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
8
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
9
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
10
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
11
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
12
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
13
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
14
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
15
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
16
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
17
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
18
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
19
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
20
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

वीज वितरण कंपनीकडून पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा बंद; मुळशीत २१ गावांमध्ये पाणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:35 IST

५० लाखांच्या थकबाकीने वीज पुरवठा बंद झाल्याने पाणीपुरवठा विभागाचे पंप बंद झाले असून, तब्बल २१ गावांचा पाणीपुरवठा थांबला आहे

घोटवडे : मुळशी तालुक्यातील तब्बल २१ गावांनी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची पाणीपट्टीच भरली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाची तिजोरी इतकी रिकामी झाली की त्यांच्याकडे विजेचे बिल देण्यासाठीही पैसे शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे मुळशी तालुक्यातील तब्बल ४९ लाख ९३ हजार ८२८ रुपयांची वीज बिलाची थकबाकी झाली आहे. परिणामी वीज वितरण कंपनीने प्रादेशिक पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा बंद केला आहे. वीज पुरवठा बंद झाल्याने पाणीपुरवठा विभागाचे पंप बंद झाले असून, तब्बल २१ गावांचा पाणीपुरवठा थांबला आहे.

याबाबत माहिती अशी की, मुळशी तालुक्यातील माले ते पिरंगुटपर्यंतच्या २१ गावांचा पाणीपुरवठा हा मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून केला जातो. त्याची पाणीपट्टी ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा विभागाकडे भरणे अपेक्षित आहे. मात्र, ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरली नाही. त्यामुळे २१ गावांकडून पाणीपुरवठा विभागाला तब्बल दोन कोटी ४ लाख ३१ हजार ५३१ रुपये बिल येणे बाकी राहिली आहे. त्यामुळे मुळशी प्रादेशिक विभागाला त्यांचे वीज बिल भरण्यासाठी देखील पैसे शिल्लक राहिले नाहीत. पाणीपुरवठा विभागाचे वीज बिलही तब्बल ४९ लाख ९८ हजार ८२८ इतके थकीत राहिले आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा विभागाला अनेकवेळा नोटिसा बजावल्या व अखेर वीजपुरवठा खंडित केला आहे. सर्व ग्रामपंचायतींनी खातेदारांना पाणीपट्टी भरण्यासाठी दवंडी व लेखी सूचना दिल्या. खातेदारांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले. मात्र, नागरिकांकडून पाणीपट्टी भरली जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा भरण्यासाठी निधी नाही.

तब्बल २१ गावांकडून पाणीपट्टीपोटी दोन कोटींपेक्षा रक्कम थकीत आहे. त्यामुळे योजना चालविणे कठीण होते. योजना कार्यान्वित करताना वीज बिल, पंप आणि यंत्रसामुग्रीची देखरेख आदी मोठे खर्च असतात. जोपर्यंत पाणीपट्टीतून ही रक्कम आपल्याकडे येत नाही तोपर्यंत हा खर्च करायचा कसा, असा प्रश्न असतो.

मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकडून सुमारे ५० लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना नोटीस पाठवूनही बिल भरले जात नाही, त्यामुळे नाईलाजास्तव वीजपुरवठा कापावा लागला.-  आनंद घुले, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी

थकीत गावांची माहिती अशी

माले - ७0,५00,

संभवे - ३५,३८0,जामगाव (दिसली )- १,४५,३५४,

अकोले -१,३१,४१३,कोंढावळे (कळमशेत )- १०,३३,७२0,

पौड (विट्ठलवाडी )- ३२,२७,१३२,भादस (शिळेश्वर )- १२,९४,३४४,

आसदे -१00३५७,खबवली -७,0८५३४

रावडे (हुलवळेवाडी )-१७,२00/दखने- ४२,२00/-

चाले (सावरगाव )-१,४२,५४८/-दारवली -१८,२५,९३९/-

मुगावडे -१,0१,२0१/-अंबडवेट -३,४७,0२0/-

भरे -६९,४00/-पिरंगुट -५७,६६,३३२/-

शेरे -१६,८00कासारआंबोली- ७,८८,८४४

घोटावडे- ३५,७५,९८३मूलखेड- १५,८८0

एकूण थकबाकी रू. २,0५,३३,५८१

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीelectricityवीजGovernmentसरकारfarmingशेतीMONEYपैसा