शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पुण्यात नाल्यामध्ये स्वच्छता सुरु असताना जेसीबीमुळे वीज वाहिनी तुटली, निम्म्या शहराची वीज गायब  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 9:09 PM

नाल्यामध्ये साफसफाई करीत असताना जेसीबीमुळे महापारेषणची 132 केव्हीची भूमिगत वीजवाहिनी तुटल्याची घटना बुधवारी दत्तवाडीतील फरशी पुलाजवळ घडली.

पुणे, दि. 21 - नाल्यामध्ये साफसफाई करीत असताना जेसीबीमुळे महापारेषणची 132 केव्हीची भूमिगत वीजवाहिनी तुटल्याची घटना बुधवारी दत्तवाडीतील फरशी पुलाजवळ घडली. त्यामुळे जीआयएस तसेच महावितरणच्या सहा उपकेंद्रांचा वीजपुरवठा गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास खंडीत झाला होता. त्यामुळे शहरातील शनिवार, नारायण, सदाशिव, कसबा, बुधवार, रविवार, शुक्रवार, मंगळवार, सोमवार, भवानी आणि नवी पेठेसह लुल्लानगर, कोंढवा,  मुकुंदनगर, गुलटेकडी, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड, कॅम्प, मार्केट यार्ड, स्वारगेट या भागातील वीज पुरवठा बंद पडला. या ढिसाळ कारभाराचा फटका तब्बल अडीच लाख नागरिकांना बसला असून याभागांमध्ये पुढील दोन दिवस चक्राकार पद्धतीने 3 ते 4 तासांचे भारनियमन करण्यात येणार आहे.महापारेषणच्या पर्वती 220 उपकेंद्रामधून भूमिगत वीजवाहिनीद्वारे रास्ता पेठ 132 केव्ही जीआयएस उपकेंद्राला वीज पुरवठा केला जातो. या उपकेंद्रातील वाहिन्यांद्वारे महावितरणच्या सेंटमेरी, कसबा पेठ, मंडई, लुल्लानगर, गुलटेकडी व रास्तापेठ या सहा उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यात येतो. फरशी पुलाजवळील नाल्यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने कचरा साफ करण्याचे काम सुरु होते. त्यासाठी सिमेंटचे कॉंक्रीट उखडण्यात आले. त्यामुळे भूमिगत वाहिन्यांचे नुकसान झाले. रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे वाहिनीमध्ये आर्द्रता वाढल्याने गुरुवारी दुपारी या वाहिनीचा स्फोट झाला. त्यानंतर रास्ता पेठ केंद्राचा वीजपुरवठा बंद पडला. या केंद्रावर अवलंबून असलेल्या अन्य सहा केंद्रांवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे 70 ते 80 मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करुन या भागातील ग्राहकांना वीज पुरविण्याचे प्रयत्न महावितरणने सुरु केले. अन्य उपकेंद्रांमधून पर्यायी व्यवस्था करण्यासाठीही प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, काही भागात नाईलाजास्तव चक्राकार पद्धतीचे भारनियमन सुरु करण्यात आल्याचे महावितरणने कळविले आहे. या वाहिनीच्या दुरुस्तीसाठी तसेच बंद पडलेल्या उपकेंद्रांचा वीज पुरवठा सुरु होण्यास दोन दिवस लागणार आहेत. ग्राहकांनी वीजेचा वापर आवश्यकतेनुसार करावा तसेच उद्योग किंवा व्यावसायिकांनी विजेऐवजी शक्य असल्यास जनरेटरचा वापर करावा असे आवाहन महावितरणने केले आहे. खोदकामात नादुरुस्त झालेली महापारेषणची वीजवाहिनी विशिष्ट प्रकारची आहे. वाहिनीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारा जाईंट चेन्नई येथून विमानाने मागविण्यात आला आहे. शुक्रवारी या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम महापारेषणकडून सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले.या भागाला बसला फटकाशहराच्या मध्यवस्तीमधील रास्ता पेठ, कसबा पेठ, भवानी पेठ, बुधवार पेठ, नवीपेठ, सदाशिव पेठ, गंजपेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनवार पेठ, नारायण पेठ, लुल्लानगर, कोंढवा, कॅम्प, गुलटेकडी, मंडई, मुकुंदनगर, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड, रहेजा गार्डन, सॅलीसबरी पार्क, गुलटेकडी, महर्षी नगर, मुकुंदनगर, मार्केट यार्ड, शंकरसेठ रोड, स्वारगेट, जिल्हाधिकारी कार्यालयाचा काही परिसर, पर्वती आदी परिसरातीला वीज वाहिनी तुटल्याचा फटका बसला.

टॅग्स :Puneपुणे