शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दूध संघात ८ जागांंसाठी निवडणूक

By admin | Updated: June 10, 2015 05:44 IST

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत १६ जागांपैकी ८ सर्वसाधारण मतदारसंघांतून उमेदवार बिनविरोध झाल्याने आता उर्वरित ८ जागांंसाठी अकरा तालुक्यांत निवडणूक होत आहे.

पुणे : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत १६ जागांपैकी ८ सर्वसाधारण मतदारसंघांतून उमेदवार बिनविरोध झाल्याने आता उर्वरित ८ जागांंसाठी अकरा तालुक्यांत निवडणूक होत असून उद्या सकाळी अकरा वाजता अंतिम उमेदवार यादी जाहिर होणार आहे. २१ जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. आज ९ जून रोजी माघारीची शेवटची मुदत होती. मुळशीतून रामभाऊ ठोंबरे, मावळमधून बाळासाहेब नेवाळे, हवेलीतून गोपाळ म्हस्के तसेच वेल्हा तालुक्यातून भगवान पासलकर व पुरंदरमधून संदीप उर्फ गंगाराम जगदाळे तसेच जुन्नरमधून बाळासाहेब खिलारी व खेडमधून चंद्रशेखर शेटे यांची बिनविरोध निवड झाली. आंबेगाव मतदारसंघातून विष्णू हिंगे यांचीही सर्वसाधारण गटातून बिनविरोध निवड झाली. शिरुरमधून बाळासाहेब ढमढेरे आणि रेखा मंगलदास बांदल यांच्यात प्रमुख लढत होत आहे. भोरमधून सर्वसाधारण गटातून अशोक थोपटे यांच्याविरुध्द अर्ज दाखल केलेले व आज माघार न घेतलेले दिलीप थोपटे यांच्यात लढत होत आहे. तर याच प्रवर्गातून दौंडमध्ये रामदास दिवेकर व नारायण फडके यांच्यात लढत आहे.अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून अरविंद मोरमारे यांनी दिलीप मोहिते गटाच्या लक्ष्मण तिटकारे यांच्या विरोधात बंडखोरी केली असून भटक्या विमुक्त जमाती मतदारसंघातून रामभाऊ टुले व जीवन तांबे यांच्यात लढत आहे. अन्य मागास प्रवर्गातून बाळासाहेब भुजबळ व दौलत लोखंडे लढत आहेत. महिला राखीव मतदारसंघात वैशाली गोपाळगडे, केशरताई पवार व नंदिनी देशमुख यांच्यात लढत होणार आहे. आठ ते सायंकाळी पाच पर्यंत मतदान२१ जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच पर्यंत मतदान होत असून आंबेगावमध्ये अवसरी दूध शीतकरण केंद्र, भोरमध्ये दूध शीतकरण केंद्र, दौंडमध्ये वरवंड जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र असणार आहे. हवेलीचे मतदान कात्रज डेअरीतच होणार असून जुन्नरमध्ये जीवन शिक्षण मंदिर, खेड तालुक्यात वाडा रोडवरील महात्मा गांधी विद्यालय, मावळात नायगाव दूध शीतकरण केंद्र, शिरुरमध्ये कोंढापुरी दूध शीतकरण केंद्र,वेल्हा मध्ये जिल्हा परिषद शाळा, पुरंदरमध्ये सासवडमधील पुरंदर हायस्कूल, मुळशीत पौड येथील जिल्हा बँकेची शाखा अशा ठिकाणी मतदान केंद्रे आहेत.