Pune: पुण्यात पादचारी ज्येष्ठ महिला आणि दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 10:15 IST2025-03-18T10:15:40+5:302025-03-18T10:15:57+5:30

हडपसर-सासवड रस्ता, तसेच कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या आहेत

Elderly woman pedestrian and bike rider die in accident in Pune | Pune: पुण्यात पादचारी ज्येष्ठ महिला आणि दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

Pune: पुण्यात पादचारी ज्येष्ठ महिला आणि दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात पादचारी ज्येष्ठ महिलेसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हडपसर-सासवड रस्ता, तसेच कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या.

हडपसर-सासवड रस्त्यावरील उरळी देवाची परिसरात भरघाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सिंधुबाई श्रीपती क्षीरसागर (८५, रा.उरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वाहन चालक मनोज अहिरे (२२, रा.निमोन, ता.चांदवड, जि.नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष श्रीपती क्षीरसागर (५५, रा.उरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष क्षीरसागर यांची आई सिंधुबाई या शनिवारी (दि. १५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्याने निघाल्या होत्या. उरळी देवाच्या परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी क्षीरसागर यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहन चालक पसार झाला असून, पोलिस उपनिरीक्षक महेश नलावडे तपास करत आहेत.

कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मझेर जिलानी शेख (३४, रा.कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मझेर यांचा भाऊ अजरुद्दीन (३७) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मझेर शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास एनआयबीएम रस्त्याने निघाले होते. त्यावेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहन चालक पसार झाला. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण अब्दागिरे तपास करत आहेत.

Web Title: Elderly woman pedestrian and bike rider die in accident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.