पुण्यातील कॅम्प परिसरात वृद्धाची निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 10:30 IST2018-02-02T10:30:24+5:302018-02-02T10:30:28+5:30

कॅम्प परिसरातील डॉ बानू कोयाजी रोडवर राहणाऱ्या एका 65 वर्षाच्या वृद्धाची मोटारसायकल वरून आलेल्या दोन जणांनी सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून निर्घृण हत्या केली आहे.

Elderly murder in the camp area of ​​Pune | पुण्यातील कॅम्प परिसरात वृद्धाची निर्घृण हत्या 

पुण्यातील कॅम्प परिसरात वृद्धाची निर्घृण हत्या 

पुणे - कॅम्प परिसरातील डॉ बानू कोयाजी रोडवर राहणाऱ्या एका 65 वर्षाच्या वृद्धाची मोटारसायकल वरून आलेल्या दोन जणांनी सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून निर्घृण हत्या केली आहे.  ही घटना गुरुवारी (1 फेब्रुवारी) मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. मारेक-यांची अद्याप ओळख पटलेली नाही.  याप्रकरणी सुरक्षारक्षक सागर वाघमारे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

सागर वाघमारे हे पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांच्या बंगल्यावर काल रात्री सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होत. डॉ. कोयाजी रोडच्या कडेला ही व्यक्ती एक तंबू टाकून रहात होती. मध्यरात्रीच्या सुमारास मोटार सायकलवरून दोघे जण आले. त्यांनी तेथेच असलेला सिमेंटचा ब्लॉक त्यांच्या डोक्यात घातला व पसार झाले. वाघमारे यांनी पोलिसांना कळविल्या नंतर त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु, तोपर्यत त्यांचा मुत्यू झाला होता.

Web Title: Elderly murder in the camp area of ​​Pune