Pune | ज्येष्ठ दाम्पत्यास चाकूच्या धाकाने लुटले; आंबेगाव तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 18:35 IST2023-02-10T18:34:36+5:302023-02-10T18:35:58+5:30

यासंदर्भात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

Elderly couple robbed at knifepoint; Incidents in Ambegaon Taluk | Pune | ज्येष्ठ दाम्पत्यास चाकूच्या धाकाने लुटले; आंबेगाव तालुक्यातील घटना

Pune | ज्येष्ठ दाम्पत्यास चाकूच्या धाकाने लुटले; आंबेगाव तालुक्यातील घटना

मंचर (पुणे ) : ज्येष्ठ दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत तीन लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील पाईनमळा वस्तीत बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. यासंदर्भात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोरांदळे गावच्या हद्दीत पाईनमळा येथे चिनकाबाई मिंडे व त्यांचे पती सीताराम मिंडे हे राहतात. बुधवारी रात्री नऊ वाजता चिनकाबाई मिंडे व तिचे पती सीताराम मिंडे जेवण करून घरात बसले होते. त्यावेळी फिर्यादी यांना एक फोन आला. फिर्यादी या फोनवर बोलत ओट्यावर गेल्या. फोनवर बोलून झाल्यानंतर त्या घरात येत असताना पाठीमागून तीन चोरटे आले. त्यातील एकाने फिर्यादीचे तोंड दाबले तर दुसऱ्याने घरात घुसून सीताराम मिंडे यांचे तोंड दाबून त्यांच्या गळ्यावर सुरी ठेवली. फिर्यादी यांचे तोंड दाबलेल्या चोरट्याने अंगावरील दागिने काढून द्या नाहीतर म्हाताऱ्याला मारून टाकू तुम्ही आवाज केला, तर कापून टाकीन अशी धमकी दिली.

यावेळी चोरट्यांनी १ लाख ८० हजाराचे चार तोळ्यांचे एक, ८० हजाराचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र, २० हजारांचे अर्धा तोळ्यांचे मंगळसूत्र, ६० हजारांची कर्णफुले, ४ हजार रुपयांची नाकातील फुल्या व ७ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करीत आहेत.

Web Title: Elderly couple robbed at knifepoint; Incidents in Ambegaon Taluk