शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

'एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते त्याग करणारे नेते आहेत' - चंद्रशेखर बावनकुळे

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 8, 2025 18:45 IST

महापालिका निवडणुका एप्रिलमध्ये होतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

- ज्ञानेश्वर भंडारे  पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वाेच्च न्यायालयात राज्य शासनाचा युक्तिवाद सुरू आहे. ओबीसी आरक्षणावर लवकरच निर्णय होईल. त्यानुसार न्यायालय निवडणूक घेण्यास मान्यता देईल. फेब्रुवारीत निकाल आला. तर, एप्रिल महिन्यात निवडणुका होऊ शकतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (दि.०८) केला. पिंपरी-चिंचवड शहरात लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या जयंती निमित्त टेनिस बॉल क्रिकेट आमदार चषक स्पर्धेचे उद्घाटन महसूलमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.बावनकुळे म्हणाले, ‘आता खूप दिवस महापालिका नगरसेवकाविना राहू नयेत. लवकरच या निवडणुका होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकर निकाल देण्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाला विनंती केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करताच महाराष्ट्र शासन मनुष्यबळ, व्यवस्था उपलब्ध करून देईल. त्यामुळे निवडणुकीसाठी सज्ज रहावे. काहीही करून पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी सदस्य नोंदणी वाढवावी.महायुती म्हणूनच निवडणूक लढविणार...बावनकुळे म्हणाले, महापालिकेची निवडणूक स्थानिक आहे. त्यामुळे स्थानिक समितीला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्र म्हणून महायुतीने सोबत लढले पाहिजे, असा निर्णय आहे. पक्ष आणि मंत्र्यांमध्ये समन्वय रहावा, खात्याचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवेत. यासाठी भाजपच्या मंत्र्यांकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे. राहुल गांधी यांनी कामठीतून विधानसभेची निवडणूक लढवावी...बावनकुळे म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माझ्या कामठी विधानसभा मतदारसंघावर गडबड झाल्याचा आक्षेप घेतला आहे. त्यांनी या मतदारसंघाचा अभ्यास केला पाहिजे. येथे सलग २५ वर्षापासून भाजप जिंकत आहे. गांधी यांनी २०२९ ची निवडणूक कामठी विधानसभेतून लढवी असे माझे आव्हान आहे. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असून चितपट केल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदे नाराज नाहीत...एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते त्याग करणारे नेते आहेत. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही. मी आणि माझा मुलगा यात ठाकरे फसले. त्यामुळे वाटोळे झाले. महायुती सरकार व्यवस्थित सुरू आहे. एकनाथ शिंदे चार खात्याचे मंत्री असून चांगले काम करत आहेत. महायुती मजबूत आहे. पुढची २५ वर्षे महाराष्ट्रात महायुती सरकार चालवेल. असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEknath Shindeएकनाथ शिंदेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMuncipal Corporationनगर पालिका