शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा: भाजप नेत्याचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 19:48 IST

कोरोनामुळे दोन वर्षांपासून शाळा बंद असून रोजगार व नोकरी गेल्यामुळे हजारो कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

पुणे:  राज्य शासनाने कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत विद्यार्थी, पालक, शिक्षणसंस्था यापैकी कोणत्याही घटकाला दिलासा देण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली आहे.

कोरोनामुळे दोन वर्षांपासून शाळा बंद असून रोजगार व नोकरी गेल्यामुळे हजारो कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.तसेच सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु असून शाळांच्या विविध सुविधांचा वापर होत नसतानाही विद्यार्थ्यांकडे संपूर्ण शुल्क वसूलीचा तगादा लावला जात आहे. तसेच शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण थांबविले जात आहे, असे नमूद करून भंडारी म्हणाले, राज्य शासनाकडे याबाबत अनेक तक्रारी दाखल असून त्यावर काहीच कारवाई होत नाही. एकही विद्यार्थी शिक्षणाच्या मुलभूत हक्कापासून वंचित राहणार नाही याची पूर्ण जबाबदारी शासनाने घेतलीच पाहिजे.

भंडारी म्हणाले , शासन व शिक्षण संस्था यांचे हितसंबंध असल्यानेच शैक्षणिक शुल्कनिश्चिचतीचा प्रस्ताव शासनाने खुंटीवर टांगून ठेवला आहे,असा आरोप करत भंडारी म्हणाले, सध्याचे सरकार हे शिक्षण सम्राटांचे आहे. शिक्षणसंस्थांच्या मनमानीमुळे पालकांची पिळवणूक होत आहे. शुल्क नियामक समित्यांकडूनही पालकांना कोणताही न्याय मिळत नाही. त्यामुळे पालकांचा समित्यांकडून केल्या जाणाऱ्या कार्यपध्दतीवरील विश्वास उडाला आहे.

शासनाने शुल्क निश्चितीच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घ्यावा, विद्यार्थ्यांवर वाढीव शुल्काचा बोजा टाकू नये, कोणत्याही कारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये; याबाबत शासनाने काळजी घेत अडचणीत असलेल्या संस्थांना मदत करावी. शासनाने शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक घटकांशी संवाद साधण्याची प्रक्रिया राबविली पाहिजे. शिक्षण क्षेत्रातील घतकांचे शोषण थांबविले पाहिजे. शासनाने याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा, अन्यथा विविध संघटनांच्या आंदोलनात सहभागी होत भाजपही रस्त्यावर उतरेल, असा इशाराही भंडारी यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाState Governmentराज्य सरकारEducationशिक्षणStudentविद्यार्थी