शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांचे अधिकार काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 8:11 PM

आरटीई अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान बिल मंजूर रक्कम अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालय अधीक्षक शिल्पा मेनन आणि क्लार्क महादेव मच्छिंद्र सारुख यांना लाचलूचपत विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले होते.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिलीच कारवाई : मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिले आदेश  माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे हे त्यांच्या विभागाचे कामकाज पाहणारदराडे यांच्याकडे दुसरी जबाबदारी देण्यात येणार

पुणे :  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आरटीई अंतर्गत अनुदान वितरणामध्ये झालेला घोळ, शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांनी स्विकारलेली लाच, खाजगी शाळेतील शिक्षकांना अधिकार नसतानाही मान्यता देणे या सारख्या अनेक घटनांमुळे मुख्यकार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी शिक्षणाधिकारी शैलेजा दराडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम ९१६१ चे कलम ९५ (ख) द्वारे दराडे यांच्यावर गुरुवारी कारवाई करत त्यांच्याकडील शिक्षण विभागाच्या खातेप्रमुखाचे अधिकार काढून घेतले. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील या कलमाद्वारे झालेली ही पहिलीच कारवाई आहे. शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान बिल मंजूर रक्कम अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालय अधीक्षक शिल्पा मेनन आणि क्लार्क महादेव मच्छिंद्र सारुख यांना लाचलूचपत विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले होते. या विरोधात जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी दराडे यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते. या गंभीर प्रकारामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी दराडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच या सर्व प्रकाराबाबत अहवाल देण्याचे आदेशही दिले होते. मात्र, या अहवालात समाधानकारक उत्तरे न दिल्याने तसेच दराडे यांना भविष्यात पदावर ठेवल्यास आणखी अनियमित गोष्टी होऊन जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होऊ शकते. यामुळे मांढरे यांनी दराडे यांच्याकडील शिक्षण विभागाचा कारभार काढून घेतला. त्यांच्या जागी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे हे त्यांच्या विभागाचे कामकाज पाहणार आहेत.

अधिका-यांवर झालेली पहिलीच कारवाईभष्ट्राचार अनियमितता यामुळे गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग चांगलाच चर्चेत होता. यामुळे सर्व व्यवहार सुरळीत चालावे तसेच अधिका-यांनी चांगले काम करावे यासाठी सुरज मांढरे यांनी सर्व अधिका-यांची बैठक घेऊन सुचना केल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या इतिहासात अशी कारवाई झालेली नव्हती. मुख्य कार्यकारी अधिका-यांना असलेल्या अधिकारातून महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम ९१६१ चे कलम ९५ (ख) द्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, दराडे यांच्याकडे दुसरी जबाबदारी देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेzpजिल्हा परिषदCrimeगुन्हाPoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचार