शिक्षण विभागाला ठोकले टाळे, लाच प्रकरणावरून शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 03:32 AM2018-04-03T03:32:46+5:302018-04-03T03:32:46+5:30

जिल्हा परिषदेच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कार्यालय अधीक्षक शिल्पा मेनन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबीला) दिल्यानंतर शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिवसनेने सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला.

 Shiv Sena aggressor from the education department, | शिक्षण विभागाला ठोकले टाळे, लाच प्रकरणावरून शिवसेना आक्रमक

शिक्षण विभागाला ठोकले टाळे, लाच प्रकरणावरून शिवसेना आक्रमक

Next

पुणे - जिल्हा परिषदेच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कार्यालय अधीक्षक शिल्पा मेनन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबीला) दिल्यानंतर शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिवसनेने सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. गटनेत्या आशा बुचके, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला टाळे ठोकले. जिल्हा परिषद अध्यक्ष, तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दराडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान बिल मंजूर रक्कम अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालय अधीक्षक शिल्पा मेनन यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. ती स्वीकारताना सांगवी येथील नॅशनल इंग्लिश स्कूल कार्यालयात मेनन (वय ४५, रेणुका हेरिटेज, पर्वती) आणि क्लार्क महादेव मच्छिंद्र सारुख (वय ४७, रा़. डहाणूकर कॉलनी, कोथरुड) यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. दरम्यान, ही लाच शिक्षणाधिकारी यांच्या सांगण्यावरून स्वीकारल्याचे मेनन यांनी अधिकाºयांनी सांगितल्याने जिल्हा परिषदेतील विरोधक आक्रमक झाले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, तसेच शिक्षणाधिकाºयांचा पदभार काढण्याच्या मागणीचे निवेदन काँगे्रसचे गटनेते विठ्ठल आवाळे तसेच शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला, तसेच अध्यक्ष विश्वास देवकाते यांना दिले होते. दरम्यान, आशा बुचके यांनी शिक्षण विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. शनिवारी तसेच सोमवारी प्रशासनाने कुठलीही कारवाई न केल्याने सोमवारी आशाताई बुचके यांनी शिक्षण विभागाला टाळे ठोकले.
या प्रकाराबाबत बुचके म्हणाल्या, की शिक्षण विभागात झालेले हे भ्रष्टाचाराचे प्रकरण गंभीर आहे. शिक्षणाधिकाºयांच्या सांगण्यावरून हे प्र्रकरण झाले असल्यास ही गंभीर बाब आहे. लाचखोर अधिकाºयांवर कारवाई करून त्यांना निलंबित करावे, तसेच या प्रकाराची चौकशी करण्यात यावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत दराडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.

शैलजा दराडे यांच्यावर कारवाई करण्याबाबत शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके, तसेच काँगे्रसचे गटनेते विठ्ठल आवाळे यांनी शनिवारी निवेदन दिले होते. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अहवाल येऊ द्या, असे त्यांना सांगितले होते. हा अहवाल आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून दराडे या दोषी आढळल्यास चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला टाळे ठोकणे हा प्रकार योग्य नाही. जिल्हा परिषदेचा नावलौकिक कसा वाढेल, यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. टाळे ठोकण्याआधी चर्चा करणे गरजेचे होते. जिल्हा परिषदेत टाळे ठोकण्याचा झालेला हा प्रकार न पटणारा आहे.
- विश्वास देवकाते, जिल्हा परिषद अध्यक्ष.

काँग्रेसच्या गटनेत्यांची आंदोलनाकडे पाठ
शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्यावर कारवाई करण्याबाबत शनिवारी काँग्रेसचे गटनेते विठ्ठल आव्हाळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले होते. दरम्यान, सोमवारी शिवसेना आणि काँगे्रसतर्फे शिक्षण विभागाला टाळे ठोकण्यात येणार होते. मात्र, आंदोलनावेळी काँगे्रसचे गटनेते अनुपस्थित राहिले.
 

Web Title:  Shiv Sena aggressor from the education department,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.