Ed Raids In Pune: पुण्यात पुन्हा ईडीची छापेमारी; व्यावसायिकांची घर, कार्यालय अशा 9 ठिकाणी झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 09:54 IST2023-04-03T09:51:14+5:302023-04-03T09:54:09+5:30
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित असलेल्या काही व्यवसायिकांच्या कार्यालयांवर छापेमारी

Ed Raids In Pune: पुण्यात पुन्हा ईडीची छापेमारी; व्यावसायिकांची घर, कार्यालय अशा 9 ठिकाणी झाडाझडती
पुणे/किरण शिंदे : ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडून पुण्यात पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली. ईडीच्या पथकाने पुण्यातील व्यावसायिकांच्या घर कार्यालय अशा 9 ठिकाणी छापे टाकले. सोमवारी पहाटेपासूनच या कारवाईला सुरुवात झाली आहे.
मुंबईतील ईडीच्या पथकाने सोमवारी पहाटेपासूनच व्यावसायिक विवेक गव्हाणे, सनदी लेखापाल जयेश दुधडिया आणि ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांची कार्यालय आणि निवासस्थानावर छापे टाकले. पुणे शहरातील हडपसर, गणेश पेठ, प्रभात रस्ता आणि सिंहगड रस्ता परिसरात ही छापेमारी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित असलेल्या चंद्रकांत गायकवाड यांच्याशी संबंधित ही छापेमारी आहे. ईडीने गेल्या महिन्यातच चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयात छापे टाकले होते. त्या वेळी गायकवाड यांच्या कार्यालयातून ईडीच्या पथकाने काही कागदपत्रे जप्त केली होती तसेच गायकवाड यांची चौकशी केली होती.