शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती वितरणाची ‘ईडी’कडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 07:00 IST

सुमारे २ हजार कोटी रुपयांचा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय ..

पुणे: समाज कल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या शिष्यवृत्ती वितरणामध्ये सुमारे २ हजार कोटी रुपयांचा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी प्रवर्तन निर्देशनालय (ईडी) कार्यालयाने राज्यातील समाज कल्याण विभागाच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांकडे पत्रव्यवहार केला आहे.त्यामुळे पुण्यासह राज्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या शिष्यवृत्ती वितरणाची माहिती तपासली जाणार आहे.वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार समिती ज्ञान मंडळाच्या विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे शिष्यवृत्ती दिल्याची माहिती समोर आली होती. त्याचप्रमाणे काही संस्थांच्या शिष्यवृत्ती वितरणात गैरव्यवहार झाल्या प्रकरणी विशेष चौकशी पथकाने तपासणी केली होती.त्यात काही आक्षेपार्ह  बाबी अढळून आल्या. त्यात समाज कल्याण विभागाने ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना वितरित झालेल्या तब्बल १७०० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीत गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले. त्यात एससी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी ईडी कार्यालयाकडे देण्यात आली. त्यावर ईडीने समाज कल्याण विभागाच्या राज्यातील सर्व प्रादेशिक कार्यालयांना पत्र पाठवून शिष्यवृत्तीची माहिती मागवली.प्रामुख्याने वर्धा येथे झालेला गैरव्यवहार महाराष्ट्रात इतर ठिकाणी झाला आहे का? याबाबत ईडीकडून तपासणी केली जात असल्याचे समाज कल्याण विभागातील अधिका-यांकडून सांगितले.ईडी कार्यालयाने केलेल्या पत्रव्यवहारानुसार समाज कल्याण विभागाने सर्व शिक्षण संस्थांकडून २०१० ते २०१७ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती माहिती मागविली आहे. पुणे विभागीय प्रादेशिक समाज कल्याण कार्यालयाने येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत शिक्षण संस्थांकडून माहिती मागविली आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे १ हजार ६०० महाविद्यालयांना समाज कल्याण विभागाने पत्र पाठवले आहे.दिलेल्या मुदतीत महाविद्यालयांनी माहिती सादर केली नाही तर भविष्यात होणा-या परिणामास प्राचार्यांना जबाबदार ठरविण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी,असे या पत्रात नमूद केले आहे.------------------------- नऊ महाविद्यालयांनी शासनाकडे जमा केली रक्कम विशेष चौकशी पथकाने दिलेल्या अहवालानुसार काही महाविद्यालयांकडे वसूली निघाली होती.त्यामुळे संबंधित महाविद्यालयांना शासनाकडे रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. शासनाच्या चौकशीला सामोरे जाण्याऐवजी तुटपुंजी रक्कम जमा केलेली बरी या विचाराने पुणे जिल्ह्यातील नऊ महाविद्यालयांनी शासनाकडे वसूलीची रक्कम जमा केली. चौकशी पथकाने केलेल्या तपासणीत या नऊ महाविद्यालयांकडे  वसूलीची ११ हजार २३ हजार ,४३ हजार आणि १ लाख रुपये अशी रक्कम निघाली आहे.-----------------राज्यातील प्रादेशिक समाज कल्याण विभागाकडून मागवली माहितीपुण्यासह राज्यातील सर्व प्रादेशिक समाज कल्याण कार्यालयांना ईडी कार्यालयाने शिष्यवृत्तीबाबत पत्रव्यवहार केला आहे. पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षण संस्थांकडून  ईडीच्या पत्रानुसार शिष्यवृत्तीविषयक माहिती मागवली आहे. महाविद्यालयांनी ही माहिती पाठविण्यास सुरूवात केली असून येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत प्राप्त होणारी माहिती ईडीला सादर केली जाईल.- अविनाश देवसटवार,उपायुक्त, समाज कल्याण प्रादेशिक कार्यालय,पुणे

टॅग्स :PuneपुणेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयStudentविद्यार्थी