शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘इको सेन्सेटिव्ह झोन’ला २२ गावांचा विरोध

By admin | Updated: November 5, 2015 02:12 IST

‘इको सेन्सेटिव्ह झोन’ला खेड तालुक्यातील समाविष्ट गावांनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात झालेल्या जनसुनावण्यांमध्ये सर्व २२ गावांतील ग्रामस्थांनी एकमुखाने त्याविरोधात ठराव केले.

राजगुरुनगर : ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ला खेड तालुक्यातील समाविष्ट गावांनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात झालेल्या जनसुनावण्यांमध्ये सर्व २२ गावांतील ग्रामस्थांनी एकमुखाने त्याविरोधात ठराव केले. तहसीलदारांच्या आदेशानुसार या झोनमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २२ गावांमध्ये नुकत्याच जनसुनावण्या घेण्यात आल्या. महसूल कर्मचारी, ग्रामसेवक आणि वनखात्याचे कर्मचारी उपस्थित होते. या झोनमुळे खाणकाम, बांधकाम आणि शेतीच्या काही कामांना बंधने येतील, असे गावकऱ्यांना वाटते म्हणून त्यांनी विरोध केला आहे. या झोनमध्ये शासकीय जमिनी घ्याव्यात; मात्र खासगी जमिनी घेऊ नयेत, असे मत ग्रामस्थांनी मांडले. पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधील जैववैविध्य जपले जावे, यासाठी शासनाने ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्या अहवालानुसार पश्चिम घाटातील महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांतील काही भाग पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अर्थात ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील काही गावांचा समावेश यात आहे. या निर्णयानुसार वृक्षतोड, खाणकाम , मोठे बांधकाम इत्यादी गोष्टींवर निर्बंध आणले आहेत. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांमधील समाविष्ट गावांनी या झोनला विरोध केला आहे. आता खेड तालुक्यातही विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. दरम्यान, खेड तालुक्यातील २२ गावे ‘इको सेन्सेटिव्ह झोन’मध्ये घेतली असून, ती सर्व रद्द करावीत; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य मंगल अरुण चांभारे यांनी खेड उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. (वार्ताहर)- खेड तालुक्यातील भोरगिरी, भिवेगाव, कारकुडी, मंदोशी, नायफड, टोकावडे, आव्हाट, भोमाळे , शिरगाव, वाडा, दरकवाडी, बुरसेवाडी, खरपुड, विहांम, वांद्रा, तोरणे खुर्द, आढे, आंभू , खरवली, वेल्हावळे, गडद, पाळू या गावांचा समावेश या झोनमध्ये करण्यात आला आहे. या झोनच्या जाचक अटींमुळे त्या गावांचा विकास ठप्प होणार आहे, असे चांभारे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.या गावांमधील आदिवासी लोक जंगलातील हिरडा, करवंदे, जांभूळ, मोहाची फुले, रानभाज्या आणि मध गोळा करून उपजीविका करतात. त्यांच्या या साधनांवर या झोनमुळे प्रतिबंध येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. विकासकामे आणि शेतीविषयक कामे करताना अडथळे येतील, म्हणून आमचा यास विरोध असून हा झोन रद्द करावा; अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.