शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

दौंडच्या पूर्व भागाला पाणी सुरू

By admin | Updated: June 4, 2015 05:24 IST

खडकवासला पाटबंधारे खात्याच्या पाटस उपविभागातील वितरिका, उपवितरिका आणि बंधाऱ्यांचे दरवाजे तातडीने बंद केल्याने दौंड तालुक्याच्या पूर्व भागाला

पाटस : खडकवासला पाटबंधारे खात्याच्या पाटस उपविभागातील वितरिका, उपवितरिका आणि बंधाऱ्यांचे दरवाजे तातडीने बंद केल्याने दौंड तालुक्याच्या पूर्व भागाला पाणी सुरू झाले आहे. पाटस उपविभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता काशिनाथ देवकाते यांचा प्रभारी चार्ज पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार, अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी काढून घेतला असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे उपविभाग दौंडचे उपविभागीय अधिकारी रवींद्र जाधव यांनी दिली. बुधवार (दि. ३) रोजी ‘लोकमत’मध्ये ‘अधिकाऱ्यानेच पाणी पळविले, दौंडच्या पूर्व भागातील शेतकरी संतप्त’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाल्याने पूर्व भागातील शेतकऱ्यांत खळबळ उडाली होती. तर, काही शेतकरी हनुमंत पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाच्या तयारीत होते. परंतु पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पाटस पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांनी वितरिका, उपवितरिका आणि बंधाऱ्यांचे दरवाजे तातडीने बंद केले. त्यामुळे पूर्व भागातील खडकी, रावणगाव, बोरीबेल, गाडेवाडी, शिंगाडेवाडी, काळेवाडी या परिसरात पाणी पूर्ववत झाले. साधारणत: तीन दिवस या भागात पाणी सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)