पुण्यात चार्जिंगअभावी ई-बस आगारातच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 12:54 PM2019-08-30T12:54:49+5:302019-08-30T12:56:05+5:30

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ९ मीटर लांबीच्या २५ तर १२ मीटर लांबीच्या ५० ई-बस आहेत.

E-bus in the absence due to charging in the pune | पुण्यात चार्जिंगअभावी ई-बस आगारातच

पुण्यात चार्जिंगअभावी ई-बस आगारातच

Next
ठळक मुद्देताफ्यामध्ये लवकरच आणखी ७५ बस दाखल होणार, चार्जिंग स्टेशनची क्षमता वाढविण्याचे काम सुरू

पुणे/थेऊर : ईलेक्ट्रिक बसच्या चार्जिंगसाठी वीजपुरवठा होणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने भेकराईनगर आगारातील ४५ ई-बस बुधवारी (दि. २८) सायंकाळपासून उभ्या आहेत. या बसला चार्जिंग नसल्याने सीएनजी व डिझेल बस मार्गावर सोडण्यात सोडाव्या लागत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, गुरूवारीही ट्रान्सफॉर्मर दुरूस्त न झाल्याने शुक्रवारीही या आगारातील सेवा बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ९ मीटर लांबीच्या २५ तर १२ मीटर लांबीच्या ५० ई-बस आहेत. या बसमधील बॅटरी चार्जिंग करण्यासाठी निगडी व भेकराईनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. ताफ्यामध्ये लवकरच आणखी ७५ बस दाखल होणार असल्याने चार्जिंग स्टेशनची क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. भेकराईनगर स्टेशनची क्षमता जास्त असल्याने एकुण १५० बसपैकी ९० बस या आगारात देण्याचे नियोजन आहे. तर सध्या या आगारात ४५ ई-बस आहेत. या बस संबंधित स्टेशनमध्ये चार्जिंग करून मार्गावर सोडल्या जातात. त्यासाठी महावितरणकडून उच्च क्षमतेचा स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास भेकराईनगर स्टेशनमधील ट्रॉन्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे येथील चार्जिंग यंत्रणा पुर्णपणे कोलमडली आहे. बुधवारी चार्जिंग झालेल्या बस चार्जिंग असेपर्यंत मार्गावर धावल्या. पण यावेळेत ट्रान्सफॉर्मर दुरूस्त न झाल्याने गुरूवारी दिवसभर ई-बससेवा ठप्प होती. निगडी येथील स्टेशन सुरू असल्याने तेथील आगारातील बस मार्गावर धावत होत्या. पण त्याची क्षमता कमी असल्याने भेकराईनगरमधील बस तिकडे चार्जिंग करण्यात अडचणी आहेत. गुरूवारी दिवसभर महावितरणच्या कर्मचाºयांना ट्रॉन्सफॉर्मर दुरूस्त न झाल्याने शुक्रवारीही ई-सेवा ठप्प राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना वातानुकूलित ई-बसच्या प्रवासापासून वंचित राहावे लागेल. दरम्यान, ई-बस सेवा बंद असल्याने आगारातील वाहतुक सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागत आहे. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. 
-----------------

वीजपुरवठा बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद आहे. ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीचे काम सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सीएनजी व डिझेलवर धावणाऱ्या ६६ बस मार्गस्थ करण्यात आल्या. भेकराईनगर आगारासह इतर आगारांकडून या बस घेण्यात आल्या. इलेक्ट्रीकलचे काम पुर्ण होताच सर्व बससेवा सुरळीत होईल.- एन. जे. करडे, आगार व्यवस्थापक, भेकराईनगर आगार

-----------

Web Title: E-bus in the absence due to charging in the pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.