यात्रेला निघालेल्या अग्निशमन जवानाने बजावले कर्तव्य; BMW ला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 10:59 AM2023-04-12T10:59:41+5:302023-04-12T11:00:57+5:30

सुट्टीवर असणाऱ्या एका जवानाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले...

Duty performed by a fireman on a pilgrimage with his family; Trying to put out the BMW fire | यात्रेला निघालेल्या अग्निशमन जवानाने बजावले कर्तव्य; BMW ला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न

यात्रेला निघालेल्या अग्निशमन जवानाने बजावले कर्तव्य; BMW ला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न

googlenewsNext

पुणेमंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास उंड्री पिसोळी, धर्मावत पेट्रोल पंपासमोर आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात मिळाली होती. त्यानंतर तत्काळ दलाकडून कोंढवा बुद्रुक अग्निशमन वाहन व वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते. पण घटनास्थळी सुट्टीवर असणाऱ्या एका जवानाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. 

मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या घटनास्थळी तेथील रहिवाशी असलेले व कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रात ड्युटी करणारे अग्निशमन दलातील जवान हर्षद येवले हे आपल्या कुटुंबासमवेत यात्रेकरिता चारचाकी वाहनातून जात होते. त्यावेळी तिथे त्यांना एका वाहनाने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याचे दिसताच त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकले आहे का याची प्रथम पाहणी केली. नंतर धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुत बीएमडब्ल्यु-एक्सवन या पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी तिथे अग्निशमन वाहन पोहोचताच जवानांनी पाण्याचा मारा करत आग पूर्ण विझवली. अग्निशमन दलाचे कार्य पार पडताच उपस्थित नागरिकांनी व कुटुंबिय यांनी जवान हर्षद येवले व इतर जवानांचे ही कौतुक केले. या कामगिरीत देवदूत जवान हर्षद येवले तसेच कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक बाबुराव जाधव, अक्षय खरात व तांडेल सोपान कांबळे आणि जवान अभिजित थळकर, अर्जुन यादव, साहिल पडये, अनिल चव्हाण यांनी सहभाग घेतला.

Web Title: Duty performed by a fireman on a pilgrimage with his family; Trying to put out the BMW fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.