शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

चाकण येथे प्रसुती दरम्यान महिलेचा बाळासह मृत्यू, तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 3:33 PM

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

चाकण : महिलेची प्रसुती करताना मुलीच्या अर्भकासह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना चाकण येथे घडली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून तीन डॉक्टरांवर चाकण पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. सपनाच्या मृत्यूनंतर काही काळ नातेवाईक संतप्त झाल्याने काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून हॉस्पिटलजवळ पोलीस बंदोबस्त देण्यात आला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी ( दि. ९ ) रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. सपना सुधीर पवळे ( वय ३०, रा. वाकळवाडी, ता.खेड, जि. पुणे, सध्या रा. फ्लॅट नं. ३०२, सुगंध बिल्डिंग इकोग्राम, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे ) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मयत सपनाचे पती सुधीर मच्छीन्द्र पवळे ( वय ३०, रा. वाकळवाडी, ता. खेड, जि. पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चाकण येथील अरगडे हॉस्पिटलचे डॉ. असित अरगडे, क्रिटिकेअर हॉस्पिटलचे डॉ. राजेश घाटकर व डॉ. सुपेकर यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहिचीनुसार, सपनाला प्रसुतीसाठी डॉ.अरगडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी औषधोपचार करताना अधिक त्रास होऊ लागल्याने महिलेला क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. येथे मात्र प्रसुती करताना अर्भक मुलगी मृत झाली. त्यानंतर सपनाही गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिला तपासण्या पूर्वीच मयत झाली असल्याचे घोषित केले. हलगर्जीपणे उपचार, इंजेक्शन, चुकीच्या गोळ्या व सलाईन दिल्याने सपनाचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूस जबाबदार झाल्याने तिन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ---------------;-

 

टॅग्स :ChakanचाकणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू