Video: पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान राडा; जेसीबी वर दगडफेक तर अधिकाऱ्यांना बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:38 IST2022-03-29T16:36:25+5:302022-03-29T16:38:52+5:30

पुणे महापालिकेत प्रशासक असल्याने शहरात सर्वत्र अतिक्रमण कारवाई सुरु झाली आहे

during encroachment operation in Pune JCB was stoned and officers were beaten to citizens | Video: पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान राडा; जेसीबी वर दगडफेक तर अधिकाऱ्यांना बेदम मारहाण

Video: पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान राडा; जेसीबी वर दगडफेक तर अधिकाऱ्यांना बेदम मारहाण

पुणे : धानोरी येथे अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण निरीक्षक व जेसीबी चालक यांच्यावर दगडफेक करत गंभीर मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी व जेसीबी चालक सुभाष कांबळे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

दरम्यान पुणे महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने मंगळवारी सकाळी धानोरी रस्त्यावरील अतिक्रमण मोहीम सुरू होती. या कारवाईला स्थानिक नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी विरोध केला. महापालिकेला मोठी अतिक्रमणे दिसत नाहीत, गोरगरीब कष्टकरी व्यापारी व पथारी चालक व्यवसायिक यांच्यावर कायमच कारवाया केल्या जातात. शहरात सातत्याने रस्त्यावरील अतिक्रमणांवर जोरदार कारवाईची मोहीम सुरू आहे. त्यातच मंगळवारी सुरु असलेल्या धानोरा येथील कारवाईत संतप्त जमावाने दगडफेक केली. या कारवाईत नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी यांना जमावाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जेसीबी वर केलेल्या दगडफेकीत चालक सुभाष कांबळे ते जखमी झाले. याप्रकरणी महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल सुरु आहे.

Read in English

Web Title: during encroachment operation in Pune JCB was stoned and officers were beaten to citizens