शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

हुंडाबळी! सुशिक्षित पुण्यातही

By admin | Updated: July 7, 2014 05:35 IST

मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्यामध्ये हुंडयासाठी होणार्‍या कौटुंबिक छळाच्या तक्रारींची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे

लक्ष्मण मोरे■ पुणे,

मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्यामध्ये हुंडयासाठी होणार्‍या कौटुंबिक छळाच्या तक्रारींची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. महागडे घर, आलिशान मोटार आणि व्यवसायासाठी माहेराहून पैसे आणावेत याकरिता विवाहितांचा छळ होण्याच्या घटना लक्षणीयरीत्या वाढत आहेत. यासोबतच संशयातून तसेच पतीच्या विवाहबाह्य संबंधांमधूनही अशा घटना वाढल्याचे चित्र आहे. शिक्षण घेतल्यानंतर माणूस विचारांनी प्रगल्भ होतो, पण पैशांपुढे प्रगल्भता छोटी पडते, असेच या कौटुंबिक छळांच्या प्रमाणावरून दिसते. २0१३ २0१४ (मे अखेर) वर्ष तक्रारी१५0५0 शिक्षण आणि सामाजिक चळवळींचे केंद्र असलेल्या पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणार्‍या विवाहितांचे प्रमाणही मोठे आहे. सुशिक्षित आणि 'वेल सेटल्ड' नागरिकांच्या घरांचे वासे कौटुंबिक हिंसाचाराने पोखरलेले असल्याचे दिसून येत आहे. पोलीस आयुक्तालयामध्ये महिलांच्या समस्यांच्या निवारणासाठी 'महिला साह्य कक्ष' आहे. या कक्षाकडे वर्षाकाठी कौटुंबिक कलहाच्या साधारणपणे एक हजाराच्या आसपास तक्रारी येतात. त्यांचे समुपदेशन करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, ज्या प्रकरणांमध्ये समझोता होत नाही, अशी प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे पाठवून गुन्हा दाखल केला जातो. हुंड्यासाठी छळ होत असेल, तर पूर्वी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न होता; परंतु आता शहराच्या प्रत्येक भागामध्ये महिला संस्था, संघटना आणि महिला बचत गट, पोलिसांच्या महिला समित्या, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या महिलांची अशा वेळी मदत घेतली जाते. तसेच, इंटरनेटवरही भारतातील प्रत्येक कायद्याचे आणि कलमाची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे.